Aurangabad : औरंगाबाद पोलिसांचा स्तूत्य उपक्रम, अपरात्री घरी परतणार्या महिलांच्या दिमतीला सशस्र महिला पोलीस

औरंगाबाद -कामावरुन रात्रपाळी करुन घरी परतणार्या महिला किंवा परगावाहून प्रवास करुन शहरात दाखल झालेल्या महिलांनी पोलिस नियंत्रण कक्षाला १०० क्रमांकावर फोन करुन घरी सोडण्याकरता मदत मागितली तर सशस्र महिला पोलिसांच्या बंदोबस्तात महिलांना घरी सोडवले जाईल.हा उपक्रम शहर पोलिस दलातर्फे राबवला जात आहे अशी माहिती पोलिसउपायुक्त निकेश खाटमोडे यांनी दिली.
चार दिवसांपूर्वी हैद्राबाद येथील पशुचिकीत्सक महिला डाॅक्टर चा अत्याचार करुन खून केल्या प्रकरणाचा निषेध नोंदवण्यासाठी शहरातील महिला पत्रकारांनी पोलिस उपायुक्त डाॅ. निकेश खाटमोडे यांची भेट घेतली.या प्रकरणाचा निषेध नोंदवून आपली बाजू मांडली. हैद्राबातेली घटने नंतर पोलिसांनी शहरातील महिलांकरता कोणते सर्तक पाऊल उचलले आहे. याबाबत जाणून घेतले. यावेळी शहरातील सर्व दैनिकांचे प्रतिनिधी आणि संपादक हजर होते. शहरात शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस या ठिकाणी मुलींच्या छेडछाडीचे प्रकार होण्यापूर्वीच दक्षता घेण्यासाठी साध्या वेषातील पोलिस हजर असावेत.जेणे करुन घडणार्या अप्रिय घटनांना आळा बसेल.या वर उपायुक्त खाटमोडे पाटील यांनी वरील उपक्रमाबद्दल माहिती दिली.
गेल्या तीन चार महिन्यांपूर्वी वाळूज औद्योगिक परिसरात कामगार महिलांसाठी एक सत्र पोलिसआयुक्तालयातर्फे आयोजित केले होते. त्यावेळी अपरात्री कामावरुन हर्सूल आणि इतर परिसरात परतणार्या महिलांना सशस्र महिला पोलिस सोबत देऊन घरी सोडवले होते. शहरात कामगार महिला, विद्यार्थींनींसाठी शहर पोलिस सज्ज असतातच परंतू तक्रार देण्यास येणार्या महिलांनी पोलिसांना स्वता:ची संपूर्ण माहिती देऊन सहकार्य करावे. कारण घडलेल्या गुन्ह्यात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यास मदत होते. व फिर्यादींची नावे माध्यमांना दिले जात नाहीत.
या वेळी पत्रकार संगीता धारुरकर, विद्या गावंडे, अर्पिता शरद, रुचिका पालोदकर जेष्ठ पत्रकार दिपक पटवे, धनंजय लांबे, स.सो. खंडाळकर व इतर पत्रकार उपस्थित होते.