Aurangabad Crime : कार मधून चोरीच्या मोटरसायकल चे सुट्टेभाग नेणारे चोरटे पोलिसांच्या जाळ्यात

औरंगाबाद – सातारा पोलिसांनी तीन रेकाॅर्डवरील चोरट्यांनी चोरीची मोटरसायकल चे सुट्टे भाग कार मधे लपवून नेतांना दोन दिवसांपूर्वी अटक केली. त्यांच्याकडून इतर ५ मोटरसायकली जप्त केल्या.ज्याची किंमत २ लाखांच्या वर आहे.
शे.अय्याज शे.मुमताज (२७) रा.शंभूनगर,शे.सादेक शे.माजेद(३०) रा. बायजीपुरा.फेरोजखान सरवरखान (४७) रा.भवाननगर अशी आरोपींची नावे आहेत. यातील दोनच आरोपी अटक आहेत.वरील कारवाई पोलिस निरीक्षक विठ्ठल पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय मच्छींद्र ससाणे, अशोक वारे,लांडे यांनी पार पाडली
जिन्सी परिसरात घरफोडी करणारा जेरबंद
औरंंंगाबाद : जिन्सी परिसरात घरफोडी करून ६५ हजाराचा मुद्देमाल लंपास करणाNया चोरट्यास जिन्सी पोलिसांनी जेरबंद केले. चोरट्याच्या ताब्यातून चोरी गेलेला ८ ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस व रोख १५ हजार रूपये असा एवूâण ३५ हजार रूपये विंâमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक व्यंकटेश वेंâद्रे यांनी शुक्रवारी (दि.२२) दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसा, शेख सलमान उर्पâ निसार गफ्फार पठाण (वय २०, रा.संजयनगर, गल्ली नं ए-११) असे चोरट्याचे नाव आहे. रेंगटीपुरा परिसरातील शेख ईस्माईल शेख मेहमुद (वय ४५) यांच्या घराचे कुलूप तोडून शेख सलमान याने ८ नोव्हेंबर रोजी ४५ हजार रूपये रोख आणि २० हजार रूपये विंâमतीचा ८ ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस चोरून नेला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर पोलिस उपायुक्त डॉ. राहुल खाडे, सहाय्यक आयुक्त निशीकांत भुजबळ, जिन्सी पोलिस ठाण्याचे निरीक्षक व्यंकटेश वेंâद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचे उपनिरीक्षक दत्ता शेळके, सहाय्यक फौजदार रफीक शेख, जमादार हारूण शेख, जी.जेढर, संजय गावंडे, सुनिल जाधव, गणेश नागरे आदींच्या पथकाने शेख सलमान उफ निसार गफ्फार पठाण याच्या मुसक्या आवळल्या.