Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Dr. BAMU, Aurangabad : विद्यापीठाचा केंद्रीय युवक महोत्सव आजपासून , मकरंद अनासपुरे उदघाटक, तीन हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

Spread the love

अभिनेते शंतनू गंगणे यांचीही उपस्थिती

औरंगाबाद येथील  डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवक महोत्सवाचे उदघाटन मराठवाडयाचे भुमिपूत्र प्रख्यात अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते गुरुवारी (दि.२१) होत आहे. सुमारे तीन हजार कलावंतांचा आगामी चार दिवस विद्यापीठाचा परिसर बहारणार आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवक महोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली असून आजपर्यंत १८५ महाविद्यालयातील २५०० कलावंतानी नावनोंदणी केली आहे, अशी माहिती मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी दिली.

‘युवा महोत्सव २०१९‘ हा २१ ते २४ नोव्हेेंबर दरम्यान होणार आहे. महोत्सवाचे उदघाटन गुरुवारी (दि.२१) सकाळी ११ वाजता प्रख्यात अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते व अभिनेते शंतनू गंगणे यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात येईल . मा कुलगुरू डॉ प्रमोद येवले अध्यक्षस्थान भूषविणार आहेत . प्रकुलगुरु डॉ.प्रवीण वक्ते, कुलसचिव डॉ.साधना पांडे, विद्यार्थी विकास संचालक डॉ.मुस्तजिब खान आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी अधिसभा, विद्या परिषद, अधिसभा व सल्लागार समितीचे सन्मानिय सदस्य यांचीही यावेळी प्रमुख उपस्थिती राहील . महोत्सवाचा समारोपप्रसंगी प्रख्यात अभिनेते सुमित राघवन व मराठवाडयाचा भुमिपुत्र, अभिनेते रोहित कुमार देशमुख हे उपस्थित राहणार आहेत.

सात रंगमंचावर सादरीकरण :

युवा महोत्सवातील ३६ कला प्रकार विद्यापीठ परिसरातील ७ रंगमंचावर सादर केले जाणार आहेत. यामध्ये स्टेज क्र. १ : सृजनरंग – समृह गायन पाश्चात्य, समुह गायन भारतीय, लोकआदिवासी नृत्य, सुगम गायन पाश्चात्य, लोकवाद्यवृंद, लावणी, कव्वाली स्टेट क्र.२ : लोकरंग : भजन, पोवाडा, वासुदेव, भारुड, गोंधळ, स्टेज क्र.३ : नाटयरंग : शास्त्रीय नृत्य, एकांकिका, मुकअभिनय, प्रहसन, स्टेज क्र.४ : नादरंग : शास्त्रीय तालवाद्य, शास्त्रीय गायन,, सुगम गायन, भारतीय स्टेट क्र.५ : नटरंग – लोकगीत, लोकनाटय, मिमिक्री, जलला, स्टेज क्र.६ : शब्दरंग : वत्तृâत्व, वादविवाद, काव्यवाचन,, प्रश्नमंजुषा स्टेज क्र. ७ : ललितरंग : चित्रकला, व्यंगचित्रकला, पोस्टर, रांगोळी, कोलाज, स्पॉट फोटोग्राफी, मृदमुर्तीकला, शॉर्ट फिल्म.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!