Aurangabad : सांगलीतील रेकॉर्डवरच्या गुन्हेगारांना अटक , मोटारसायकलसह अर्धा किलो चांदी जप्त

औरंगाबाद- शहरातील पद्मावती ज्वेलर्स ची रेकी करुन अपरात्री भटकणार्या सांगलीतील दोन दरौडेखोरांना गस्तीवर असणार्या पुंडलिकनगर पोलिसांनी पकडले.त्यांच्याकडून अर्धा किलो चांदी आणि चोरीची मोटरसायकल जप्त केली.
रोहित बाबासाहेब भेंडे(२१) रा.एरंडोली ता. मिरज जि.सांगली व गौतम चंद्रकांत थोरे(२०) रा. पाथरवाला ता.नेवासा जि.अहमदनगर अशी अटक आरोपींची नावे आहेत.दहा दिवसांपूर्वी सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील दिघंची गावात वरील दोघांचे साथीदार अमोल शहाजी शिरतोडे (२४) रा.लिंगरी ता.विटा जि.सांगली आणि पाथरवाला गावात राहणारा संजय पवार(२०) यांनी सांगली जवळील राजेवाडीतील बाबू जगताप सराफाचे दुकान फोडून १लाख ९० हजारांचा ऐवज ज्यात दीड तोळा सोने आणि दीड किलो चांदी लंपास केल्याची कबुली दिली.
यातील रोहित भेंडे याच्या विरोधात सांगली, कोल्हापूर, कोपरखैराणे नवीमुंबई या ठिकाणी गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले.वरील आरोपींनी अटक होण्यापूर्वी गारखेडा परिसरातील अथर्व प्लाझा येथे राहणार्या पूनम चोपडा(३९) यांची २५हजार रु. असलेली पर्स हिसकावून नेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. या प्रकरणी चोपडा यांनी पुंडलिकनगर पोलिस ठिण्यात तक्रार देण्यास धाव घेतली असता. वरील दरोडेखोरांनीच पर्स हिसकावण्याचा प्रयत्त्न केल्याचे चोपडा यांनी सांगितले. कारण याच वेळी गस्तीवरील पोलिसांनी वरील दोन दरोडेखोरांना पोलिस ठाण्यात आणले होते.वरील कारवाई सहाय्यक पोलिस निरीक्षक घन्नशाम सोनवणे,पीएसआय विकास खटके, पोलिस कर्मचारी प्रभाकर सोनवणे, रमेश सांगळे,मच्छिंद्र शेळके, बाळाराम चौरे, स्वपप्नील विटेकर, शिवाजी गायकवाड यांनी पार पाडली.