Aurangabad : जिल्हा मध्यवर्ती कारागृहात बंदीजनांसाठी सर्वरोग निदान आणि उपचार शिबीर

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमानाने औरंगाबाद मध्यवर्ती कारागृहातील आजारी बंदी यांच्यासाठी करिता ” सर्वरोग निदान व उपचार शिबीर “आयोजित करण्यात आले होते. सदर शिबिराचे उद्घाटन मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश एच.डी.टेकाळे, औरंगाबाद यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
या प्रसंगी जिल्हा न्यायाधीश-१ औरंगाबाद भोसले तसेच दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर औरंगाबाद , सूर्यवंशी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण औरंगाबाद यांचे सचिव इंदलकर व व जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय चिकलठाणा ,औरंगाबाद .डॉ. कुलकर्णी तसेच घाटी रुग्णालय औरंगाबाद येथून बंदयांची तपासणी करण्यासाठी आलेले वैद्यकीय अधिकारी यांची उपस्थिती होती.
सदर शिबिरामध्ये 250 ते 300 बंदयांनी भाग घेतलेला असून त्यांचे तपासणी व उपचार सुरू आहेत.