औरंगाबाद : सर्वाेच्च न्यायालयाच्या निकालानंतर : पोलीस आयुक्तांसह सर्व पोलीस अधिकारी , एसपीओ यांचा तगडा बंदोबस्त

मनाई आदेशाचे उल्ंघन करणारे तीन अटकेत, बाजारपेठेत शुकशुकाट
औरंंंगाबाद : अयोध्येतील वादग्रस्त जागेसंदर्भाचा निकाल सर्वाेच्च न्यायालयाने शनिवारी (दि.९) जाहीर केला. या निकालानंतर शहराच्या नागेश्वरवाडी आणि पदमपुरा परिसरात मनाई आदेशाचे उल्ंघ्घन करंत फटाके फोडल्या प्रकरणी पदमपुरा परिसरातून वेदांतनगर पोलिसांनी तीघांना अटक केली आहे. नितीन विजय राजपूत(२४) पुष्कर राजेंद्र घोडेले(२४) सचिन नरेश बन्सवाल(२६) तिघेहि रा. पदमपुरा धंदा खासगी नौकरी अशी अटक आरोपींची नावे आहेत.त्याच प्रमाणे क्रांतीचौक पोलिस ठाण्यातहि अज्ञातांविरोधात मनाई आदेश मोडल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. बाकी शहरात शांतता होती अशी माहिती पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिली आहे.
सर्वाेच्च न्यायालय निकाल जाहीर करणार असल्याने शुक्रवारी रात्रीपासूनच शहराच्या विविध भागात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
अयोध्येतील वादग्रस्त जागेसंदर्भात सर्वाेच्च न्यायालय पुढील आठवड्यात निकाल जाहीर करेल अशी चर्चा गेल्या आठ ते दहा दिवसापासून सुरू होती. परंतु शुक्रवारी रात्री सर्वाेच्च न्यायालयाने शनिवारी निकाल जाहीर करण्यात येईल असे जाहीर केले. त्यामुळे शुक्रवारी रात्रीपासूनच शहराच्या विविध भागात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शनिवारी सकाळपासूनच शहरातील चौका-चौकात पोलिसांचे फिक्स पार्इंन्ट लावण्यात आले होते. तसेच पोलिसांची गस्त देखील वाढविण्यात आली होती. त्याचप्रमाणे पोलिस आयुक्तालयात दंगा नियंत्रण पथक, क्युआरटी पथक, स्ट्रायकींग फोर्स आदी तयार ठेवण्यात आले होते. परंतु शहरात तुरळंक प्रकार वगळता कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे पोलिसआयुक्तांनी सांगितले.
दरम्यान, शनिवारी सकाळपासूनच निरालाबाजार, औरंगपुरा, गुलमंडी, पैठणगेट, क्रांतीचौक, उस्मानपुरा, शहागंज, बुढ्ढीलेन, सिटीचौक आदी भागातील बाजारपेठेत शुकशुकाट असल्याचे पहावयास मिळाले. सर्वोेच्च न्यायालयाने सकाळी साडेदहा ते साडेअकरा वाजेच्या दरम्यान आपला निकाल जाहीर केला. या काळात शहरातील बहुतांशी रस्ते निर्मुणष्य झाले होते. तर ज्या व्यापा-यांनी सकाळी आपली दुकाने उघडली होती त्यांनी दुकानातील टिव्हीवर तसेच मोबाईलवर सर्वाेच्च न्यायालयाचा निकाल ऐकला. निकालानंतर व्यापा-यांसह शहरवासीयांनी आपल्या नातेवाईकांना व मित्रांना फोन करून शहरात काही अनुचित प्रकार घडला आहे का याची माहिती दिवसभर घेत होते.वरील प्रकरणी पोलिस निरीक्षक रामेश्वर रोडगे आणि उत्तम मुळंक पुढील तपास करंत आहेत
पोलिस आयुक्तांसह वरिष्ठ अधिकारी गस्तीवर
अयोध्यतील वादग्रस्त जागेच्या निकालाच्या पाश्र्वभूमीवर शनिवारी शहरात तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्यासह, उपायुक्त निकेश खाटमोडे, डॉ. राहुल खाडे, गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे, हनुमंत भापकर, गुणाजी सावंत, रविंद्र साळोंखे, भुजबळ आदी अधिका-यांनी शहराच्या विविध भागात गस्त घालून बंदोबस्ताचा आढावा घेतला.
सोशल मिडियाची ग्रुपही शांतच
अयोध्येतील वादग्रस्त जागेच्या निकालाच्या पाश्र्वभूमीवर पोलिसांनी सोशल मिडियावर बारीक लक्ष ठेवले होते. तसेच आक्षेपार्ह संदेश व्हायरल करणाNयावर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशाराही दिला होता. त्यामुळे शनिवारी सोशल मिडिया साईट असलेल्या व्हॉट्सअप वरील विविध ग्रुपही शांतच असल्याचे पहावयास मिळाले. तर पेâसबुक, टिवीटर हॅन्डलवरून अनेकांनी शांतता ठेवावी असे आवाहन करणारे पोस्ट शेअर केले होते.