Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : तोतया सी.आय.डी. अवतरले,व्यापार्‍याची चैन अंगठी लंपास

Spread the love

औरंगाबाद – सातारा पोलिस ठाण्यापासून अवघ्या १ कि.मी. अंतरावर दोन तोतया सी.आय.डी.नी व्यापार्‍याची १५ ग्रॅम ची सोन्याची चैन व आठ ग्रॅमची अंगठी असा ५५ हजारांचा ऐवज रविवारी दुपारी १२.३० वा. पळवला. या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

दिशानगरीत राहणारे गोपीचंद खानचंदानी(७२) हे दुपारी ओमसाई मोटर गॅरेज पासुन जात असतांना समोरुन एक हेल्मेटधारी मोटरसायकलस्वार आला व त्याच वेळस एक पायी चालणारा इसमही तेथे उभा होता. मोटारसायकलस्वाराने पायी चालणार्‍या आपल्या साथीदाराला उद्देशून म्हटले की, जवळ खून झाला आहे. मी चेकींग करत आहे.तुमच्याकडे काही दागिने वस्तू असल्यास काढून ठेवा. या वेळी खानचंदानी तेथून जात होते. तेंव्हा दोन भामट्यांचे बोलणे त्यांनी ऐकले.त्यांनाही दोन भामट्यांनी वरील थाप मारली व त्यांच्या गळ्यातील दीड तोळ्याची चैन व आठ ग्रॅमची अंगठी फिर्यादीच्या रुमालात बांधून देण्याचा बहाणा करंत पोबारा केला. दरम्यान फिर्यादीने खिशात हात घालून रुमाल काढला असता त्यांची भामट्यांनी चैन व अंगठी लंपास केल्याचे आढळले.गुन्हा दाखल झाल्यावर पोलिस निरीक्षक विठ्ठल पोटे यांनी परिसरातील सी.सी. टि.व्ही. फुटेज तपासले. त्यामधे लाल मोटरसायकलवर दोन भामटे पळून जात असल्याचे अस्पष्ट दिसत होते. या प्रकरणी पुढील तपास पोलिस हेडकाॅन्स्टेबल प्रदीप रतन ससाणे करंत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!