औरंगाबाद -हैद्राबादला स्पाइसजेटची प्रवास सुविधा

औरंगाबाद विमानतळावरून अहमदाबाद, दिल्ली, मुबई आणि उदयपूर सेवांच्यानंतर कालपासून ‘स्पाइस जेट’तर्फे हैदराबाद-औरंगाबाद-हैदराबाद विमान सेवा सुरू करण्यात आली असून काल पहिल्याच फेरीत या विमानातून ७८ प्रवाशी हैदराबादच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती आहे .
‘स्पाइसजेटच्या सूत्रांनी सांगितले कि , दिवाळीच्या मुहूर्तावर ‘स्पाइसजेट’ने औरंगाबादहून हैदराबाद-औरंगाबाद-हैदराबाद विमान सेवा सुरू केली. ही पहिलीच विमानसेवा असल्याने दिवाळीच्या महुर्तावर मर्यादित सीटपर्यंत पहिल्या विमान प्रवासासाठी अडीच ते पावणे तीन हजार रुपयांपर्यंत प्रवाशांना विशेष ऑफर देण्यात आली होती. त्याचा ७८ प्रवाशांनी लाभ घेतला. हैदराबाद मार्गावर सध्या ‘ट्रु जेट’ची विमानसेवा सुरू आहे. त्यानंतर आता स्पाइस जेटने ही सेवा सुरू केल्याने औरंगाबादकरांना हि एक चांगली सुविधा निर्माण झाली आहे.
औरंगाबाद विमानतळावरून दोन महिन्यापासून विविध शहरांकरिता विमानसेवा सुरू होत आहेत. ‘ट्रु जेट’ विमान कंपनीने अहमदाबाद-औरंगाबाद-अहमदबाद, ‘स्पाइस जेट’ने ८ ऑक्टोबरपासून दिल्ली-औरंगाबाद-दिल्ली, तर ‘एअर इंडिया’ने १६ ऑक्टोबरला मुंबई-औरंगाबाद-उदयपूर विमान सेवा सुरू केली. चार ते सहा हजार रुपये असे या तिकिटाचे दर आहेत.