औरंगाबाद मनपा अधिकाऱ्यांची चौकशी प्रकरणे प्रलंबीत असतानाच स्वेच्छा निवृत्ती, राजेंद्र दाते पाटील यांची चौकशीची मागणी

औरंगाबाद महापालिकेतील निलंबित अधिकारी वर्गाची विभागीय चौकशी करणे बाकी असताना व प्रकरणे न्याय प्रविष्ठ असतांना आणि महाराष्ट्र महानगर पालीका अधिनियम कलम 53(1) 56 (5) अन्वये बाकी असतांना आणि 230 टी डी आर किमान 200 प्रकरणात चौकशी सुरु असतांना एक तर गुन्हेगारी वर्तन केले शासनाच्या पैशांचा दुरुपयोग करणे तसेच मनपा सारख्या सार्वजनिक संस्थेला धोका देणे म्हणुन गुन्हे दाखल करावयाचे सोडून मनपा आयुक्तांनी अधिकाऱ्यांना स्वेच्छा निवृत्ती देऊन त्यांची पाठराखण केल्याची घणाघाती टीका सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र दाते पाटील यांनी केली असून या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे.
या प्रकरणी दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे कि , अनेक प्रकरणात दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांना तत्कालीन आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी पाच पेक्षा जास्त प्रकरणात दोषी केलेले असतांना व सदर प्रकरणात एफ आय आर दाखल असतांना एक तर गैर पद्धतीने पदोन्नती देऊन त्यांच्या दोषांवर पांघरून टाकण्याचे काम केले जात आहे . जन्मभर दोषी रहा व दोष सिद्धीच्या वेळी स्वेच्छा निवृत्ती सारखी किमया वापरून शासन नियमांचे व पर्यायाने मनपा सारख्या संस्थांचे आर्थिक नुकसान करणाऱ्यांना असे हार तुरे घालून रवाना करण्याचे धाडस झाले असून शासनाने मनपाचा कारभारी स्वच्छ पारदर्शी व्हावा म्हणुन करोडो रुपयाचे अनुदान इ आर पी योजनेत दिले असून संगणकीय आधुनिकीकरण करण्यासाठी एक आधुनिक सॉफ्टवेअर प्रणाली विकत घेणे व ती मनपा क्षेत्रात कार्यान्वीत करण्यासाठी ज्यांच्यावर जवाबदारी होती त्यातील संगणक प्रिंटर व तत्सम साहीत्य तरी कुठे आहे याची खातर जमा न करताच या अधिकाऱ्यांना स्वेच्छा निवृत्ती मंजुर करून पसार होण्याचा मार्ग आयुक्तांनी मोकळा करून दिला असल्याचा आरोप दाते पाटील यांनी केला आहे.
मनपा अधिकाऱ्यांची स्वेच्छा निवृत्ती प्रकरणात लक्ष घालू- केंद्रेकर
दरम्यान निलंबित अधिकारी वर्गाची विभागीय चौकशी करणे बाकी असताना व प्रकरणे न्याय प्रविष्ठ मनपा आयुक्तांनी अधिकाऱ्यांना स्वेच्छा निवृत्ती देऊन त्यांची पाठराखण का केली ? या बाबत आपण लक्ष घालू असे विभागिय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी सांगितले. दोषी अधिकार्यांना तत्कालिनआयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी पाच पेक्षा जास्त प्रकरणात दोषी केलेहोते. तसेच सदर प्रकरणात एफ आय आर दाखल आहेत. अशा अधिकार्यांना चुकीच्या पद्धतीने पदोन्नती देऊन त्यांच्या दोषांवर पांघरून टाकण्यात आले का ? याचीही चौकशी आपण करण्याचे आदेश देणार आहोत.सध्या महापालिका आयुक्तांचा पदभार जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्याकडे आहे.अशी माहिती मिळाल्यानंतर आमच्या प्रतिनिधीने त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. हा प्रकार विभागिय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या कानावर गेल्यावर त्यांनी आता मला लक्ष द्यावे लागेल अशीप्रतिक्रिया देत वरील खुलासा केला.
मनपा मधील यत्रंणा खऱ्या समस्या व प्रश्न शासनाला व जनतेला कळू नये असे कुरघोडी करण्यात व श्रेय घेण्याच्या स्पर्धेत मुळ विषय बाजूला ठेऊन विविध आरोपा खाली निलंबित केलेले अनेक अधिकारी व कर्मचारी आहेत हे तर इतके पक्के आहे कि ते काहीच उमजू देणार नाहीत असे नमूद करून दाते पाटील म्हटले आहे कि , आयुक्तांनी जिथे ज्यानी भानगडी केल्या त्याच अभि यंत्यास नगर रचना विभाग प्रमुख केले. या साठी ना प्रस्ताव ना ठराव ना सूचक ना अनुमोदक तरी सुध्दा ही मंडळी हवे ते लाभाचे पद उपभोगत होती ही बाब अत्यंत गंभीर आहे. ज्यांची ज्या कामातील अनियमितते बाबत चौकशी करायची आहे तेच त्या त्या विभागाचे प्रमुख आहेत मग चौकशी कशी पूर्ण होणार ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. अनेक प्रकरणात सीएजीने काय म्हटले आहे ते आणि काय काय ताशेरे आहेत ते सुध्दा आयुक्तांनी तपासले पाहीजे होते. दिनांक २० जुलै २०१७ रोजीची कार्यक्रम पत्रिका क्रमांक ४४ चा कारणा पुरता उतारा जो कि,विषय क्रमांक ११३०,११३१, ११३२,११३३ बाबतीत असून हा जर नक्कीच तपासला तर यांनी अनेक बेकायदेशीर बाबी घडवल्या आहेत त्या पुढे येतील.
आज पर्यंत दृष्टीक्षेपातील घोटाळे पाहीले तर प्रामुख्याने आकृतिबंध घोटाळा- रेनवाटर हार्वेस्टिंग घोटाळा- हर्सुल तलाव गाळ घोटाळा -सिमेंट रस्ता -औरंगपुरा फटाका कांड-बिबट्या वाघ मृत्यू प्रकरण-टी.डी.आर. घोटाळा- बिल्डर्सना बोगस पुर्णत्व प्रमाणपत्र घोटाळा -नाला सफाई घोटाळा- बचतगट निधी – कर्मचारी शैक्षणीक अहर्ता प्रकरणे- सिडको हडको भागातील जेष्ठ नागरीका साठी बनविण्यात आलेल्या शतपावली मैदानाला चारचाकी वाहन पार्कीग तसेच अतिक्रमणे अशी एक ना अनेक प्रकरणे असून अशा प्रकारे एक ना अनेक गंभीर बाबी आहेत. निलंबीत अधिकारी कर्मचारी वर्गाच्या संचीका प्रथम: प्रशासकाच्या नजरेतून पाहील्या कि कायद्याचे जे उल्लंघन झाले आहे आपोआप समोर येईल. अत्यंत धूर्त असलेली ही मंडळी मनपा मध्ये त्याच त्याच ठिकाणी ठाण मांडून आहे असा आरोप करताना करतानां राजेंद्र दाते पाटील यांनी म्हटले आहे कि,या बाबतीत मी एक स्वतंत्र पत्र मनपा आयुक्त कार्यालयात या पुर्वीच दिले आहे मात्र त्याची चौकशी झाली नाही.