औरंगाबाद मध्यवर्ती कारागृहात बंदीवानांसाठी ग्रंथालयाची सुविधा

औरंगाबाद मध्यवर्ती कारागृहातील नवीन सर्कल येथे जीवन विकास ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमानाने वाचन केंद्र चालू करण्यात आलेले आहे .
त्याचे उद्घाटन आज शासकीय ग्रंथालयाचे सुनील हुसे , सहाय्यक ग्रंथालय संचालक यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमासाठी जोशी सर , महाराष्ट्र न्याय प्रिटायर्ड जज यांची देखील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. जीवन विकास ग्रंथालया यांच्यामार्फत 1000 विविध प्रकारची पुस्तके बंद्यांना वाचण्यासाठी पुरविण्यात आलेली आहेत.