Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्र विधानसभा २०१९ : मतदानासाठी निवडणूक आयोग सज्ज , ३ लाख पोलिसांचा तगडा बंदोबस्त

Spread the love

निवडणूक आयोगाने राज्यातील  विधानसभेच्या २८८ जागांसाठी होणाऱ्या मतदानाकरिता निवडणूक आयोग सज्ज झाला असून शांततेत मतदान पार पडावे म्हणून पोलिसांचा तगडा  बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यासाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, केंद्रीय राखीव दल, गुजरात राज्य राखीव दलालाही पाचारण करण्यात आले आहे. दुर्गम भागावर पोलीस विभागाला नियंत्रण ठेवता यावे म्हणून  वायरलेस सेट तसेच संवेदनशील केंद्राच्या टेहाळणीसाठी ड्रोनचाही वापर करण्यात येणार आहे. या शिवाय गुगल मॅपमध्ये सर्व मतदान केंद्रे टॅग केल्याने मतदान केंद्र नेमके कुठे आहे, किती जवळ किंवा लांब आहे हे मतदारांना घर बसल्या समजणार आहे.

मतदानाची वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ६ पर्यंत असून, सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान केंद्राबाहेरील मतदान रांगेत उभ्या असणाऱ्या मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता येईल. दरम्यान मतदान केंद्रात जाताना मतदारांना सोबत मोबाईल नेण्यास बंदी करण्यात आली आहे.

निवडणूक आयोगाने राज्यातील २७६२ मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ३५० तुकड्यांसह सुमारे तीन लाख पोलिसांचा बंदोबस्त राज्यभरात तैनात करण्यात आला आहे. त्याशिवाय छत्तीसगड, गुजरात, मध्यप्रदेश आणि तेलंगणामधून होमगार्ड्स मागवण्यात आले आहेत. आतापर्यंत ३३ उमेदवारांसह १७७९ जणांविरोधात आचारंसहिता भंगाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  राज्यभर उद्या (दि. २१ ऑक्टोबर) विधानसभेच्या २८८ जागांसाठी मतदान होणार आहे.

मतदारांनी सोबत ‘वैध मतदार ओळखपत्र’ (Electoral Photo ID Card / EPIC) आणणे गरजेचे आहे. सदर ओळखपत्र नसल्यास निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या ११ प्रकारच्या छायाचित्र ओळखपत्रांपैकी एक ओळखपत्र मतदानाला जातांना सोबत घेऊन जावे. मतदाराचे नाव मतदार यादीमध्ये आहे व ज्याच्याकडे वैध मतदार ओळखपत्र (EPIC) आहे अशा मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता येईल. मात्र, वैध मतदार ओळखपत्र नसल्यास भारत निवडणूक आयोगाने निर्धारित केलेल्या ११ ओळखपत्रांपैकी कोणतेही एक ओळखपत्र सोबत आणणे गरजेचे आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!