Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Maharashtra Vidhansabha Live : गडचिरोलीत कर्तव्यावर असणाऱ्या शिक्षकाचा भोवळ येऊन मृत्यू, जाणून घ्या कुठे किती झाले मतदान ?

Spread the love

5 वाजेपर्यंत हरयाणात सरासरी ५०.५९ % तर महाराष्ट्रात सरासरी 54.53 टक्के मतदान


संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरुवात झाली आहे. राज्यातील ३ हजार २३७ उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार आहे. राज्य विधानसभेच्या २८८ जागांवर मतदान केले जात असून सातारा येथे विधानसभेसह लोकसभा पोटनिवडणुक देखील पार पडत आहे. सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली असून दुपारपर्यंत  राज्यात ४३.७८ टक्के मतदान झाले आहे.


हाती आलेल्या मतदानाची टक्केवारी सोबतच्या फोटोप्रमाणे. सविस्तर आकडेवारीसाठी पुढील लिंकवर क्लिक करा. 


https://ceo.maharashtra.gov.in/Downloads/AC2019/Poll%20percentage%20(from7.00%20am%20to%2005.00%20pm).pdf

 


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शिवसेनेचे वरळीतील उमेदवार आदित्य ठाकरे, रवींद्र वायकर,  अर्जुन खोतकर , भाजपचे हरिभाऊ बागडे , अतुल सावे , चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, गिरीश महाजन, पंकजा मुंडे, बबनराव लोणीकर , गणेश नाईक, सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे-पाटील, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, रोहित पवार, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड, पृथ्वीराज चव्हाण, चंद्रकांत हंडोरे, प्रणिती शिंदे, अमित देशमुख, आशिष देशमुख, नसीम खान, शेकापचे विवेक पाटील, माकपचे नरसय्या आडम आदी दिग्गजांचं भवितव्य आज मतपेटीत बंद झालं आहे.


गेल्या चार आठवड्यांपासून सुरू असलेला प्रचाराचा धुरळा आणि राजकारण्यांकडून एकमेकांवर झडलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीनंतर आज मुंबईसह महाराष्ट्रात विधानसभेच्या २८८ जागांसाठी मतदान पार पडले. २०१४च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदारांमध्ये मतदानाचा फारसा उत्साह दिसला नाही. त्यातच राज्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावल्याने त्याचाही मतदानावर परिणाम झाला. त्यामुळे यंदा मतदानाचा टक्का घसरल्याचं दिसून येतं. राज्यात साडेपाच पर्यंत ५३.४६ टक्के मतदान झालं. दरम्यान, तुरळक घटनांचा अपवाद वगळता राज्यात शांततेत मतदान पार पडले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दिग्गजांचं भवितव्य मतपेटीत बंद झालं आहे.

कोणत्याही दबावाला बळी न पडता घराबाहेर पडून मतदान करा; शरद पवारांचं आवाहन

अकोला: वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी बजावला मतदानाचा हक्क

मतदानापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सिद्धिविनायक मंदिरात घेतलं दर्शन

नागपूर पश्‍चिम मतदारसंघात मुख्यमंत्री फडणवीसांविरोधात लढणारे कॉंग्रेसचे उमेदवार आशिष देशमुख यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर येथे कुटुंबीयांसह केलं मतदान

अमरावती: मोर्शी मतदार संघातील काँग्रेस महाआघाडीचे समर्थन असलेले स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार देवेंद्र भुयार यांना मारहाण, चारचाकी वाहन जाळले

राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरूवात झाली आहे. राज्यातील अनेक भागांत कोसळणाऱ्या पावसामुळे निवडणूक यंत्रणांना रविवारी दिवसभर तारेवरची कसरत करावी लागली. राज्यातील ३,२३७ उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार आहे.

राज्य विधानसभेच्या २८८ जागा तर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होईल. राज्यात ८ कोटी ९८ लाख ३९ हजार ६०० मतदार आहेत. मतदान निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून, सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

९६ हजार मतदान केंद्रे

मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून, राज्यात ९५,४७३ मुख्य तर १,१८८ सहाय्यक अशी एकूण ९६ हजार ६६१ मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. चार कोटी ६८ लाख ७५ हजार, ७५० पुरुष तर चार कोटी २८ लाख ४३ हजार ६३५ असे एकूण आठ कोटी ९८ लाख ३९ हजार ६०० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यावेळी दोन हजार ६३४ तृतीयपंथी, तीन लाख ९६ हजार अपंग आणि एक लाख १७ हजार ५८१सव्‍‌र्हिस मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बजावला मतदानाचा हक्क

औरंगाबाद: महिलांसाठी खास ‘सखी मतदान केंद्र’ सज्ज

सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपुरात भाऊसाहेब दफ्तरी मतदान केंद्रावर बजावला मतदानाचा हक्क

आपल्या हा अधिकार मिळाला आहे. सर्वांनी मतदानाचा हक्क बजावावा. लोकशाहीचा आज उत्सव आहे, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं. त्यांनी काटेवाडी येथे जाऊन आपला मतदानाचा हक्क बजा वला. मतदानानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला

भाजपाचे पनवेलचे उमेदवार आणि विद्यमान आमदार प्रशांत ठाकूर यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला.

आज लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव आहे. सर्वांनी मतदानाचा हक्क बजावावा. सर्वांनी आपलं कर्तव्य पार पाडावं. गेल्या पाच वर्षांत जे काम झालंय त्या विकासाकडे पाहून जनता भाजपासोबत राहिल असा विश्वास त्यांनी नागपूरमध्ये आपला मतदानाचा हक्क पार पाडला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

पुण्यातील एका मतदान केंद्राबाहेर मतदारांसाठी ट्रॅक्टरच्या ट्रॉली एकमेकांना जोडून मतदान केंद्रांपर्यंत पोहोचण्याची व्यवस्था करण्यात आली.

शिर्डी : राधाकृष्ण विखे-पाटलांनी यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी शालिनीताई विखे-पाटील. खासदार सुजय विखे-पाटील आणि धनश्री विखे-पाटील यांनीदेखील मतदानाचा हक्क बजावला.

मुंबई: चेंबूर येथील सखी मतदान केंद्रावर महिला मतदारांचे खास स्वागत

लातूर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ८ टक्के मतदान

जालना जिल्ह्यात सकाळी ९ वाजेपर्यंत सर्वाधिक १० टक्के मतदान

मुंबई: कुर्ला विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्रमांक १३६ हे सखी केंद्र आहे. या केंद्रावर अद्याप एकाही मतदाराने हजेरी लावलेली नाही.

औरंगाबाद: आझाद हायस्कूल टाऊन हॉल येथील मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन ४० मिनिटे बंद; मशीन बदललल्यानंतर मतदान प्रक्रिया पुन्हा सुरू

यंदाही मतदानानंतर सेल्फीचा ट्रेंड कायम, सोशल मीडिया साइट्ससह व्हॉटसअपच्या स्टेट्सवरही मतदान केल्यानंतरचे फोटो

कोणत्याही दबावाला बळी न पडता घराबाहेर पडून मतदान करा; शरद पवारांचं आवाहन

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ताडदेव येथील महापालिका शाळेत बजावला मतदानाचा हक्क

अहमदनगर : संगमनेर मतदारसंघात ७.८४ टक्के मतदान

अहमदनगर : कोपरगाव मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत ४.७६ टक्के मतदान

भाजपातर्फे विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांना बेलापूरमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यांनी सहकुटुंब आपला मतदानाचा हक्क बजावला. त्याच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अशोक गावडे आणि मनसेचे गजानन काळे याचं आव्हान असणार आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या कुटुंबीयांसोबत आपला मतदानाचा हक्क बजावला.यावेळी त्यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदेही उपस्थित होत्या.

नवी मुंबईतील ऐरोली मतदार संघातील भाजपाचे उमेदवार गणेश नाईक यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि त्यांच्या पत्नी वर्षा पटेल यांनी आपला मतदानाच हक्क बजावला. गोंदिया येथील मतदान केंद्रात त्यांनी मतदान केलं. भाजपाचे उमेदवार गोपाळ अग्रवाल आणि काँग्रेसचे उमेदवार अमर वर्दे यांच्यात या ठिकाणी मुख्य लढत होत आहे.

पुण्यात अनेक ठिकाणी रिमझिम पाऊस सुरू आहे. त्यातच शिवाजीनगर येथील विद्याभवन शाळेत रात्रीपासून वीज गायब आहे. अशातच मेणबत्ती लावून मतदानाची प्रक्रिया सुरू करण्यात आली.

पावसामुळे सांगलीत धीम्या गतीनं मतदान

विद्यमान आमदार आणि ठाणे विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार संजय केळकर यांनी आपल्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!