Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

” त्या ” वादग्रस्त व्हिडीओ प्रकरणी मोर्चा काढल्याने धस आणि भीमराव धोंडे यांच्याविरुद्ध आचारसंहिता भंगाचे गुन्हे

Spread the love

परळी मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आणि विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या कथित व्हिडिओ क्लिपचा निषेध करण्यासाठी काढण्यात आलेल्या मूक मोर्चात भाषण केल्याप्रकरणी भाजप नेते सुरेश धस आणि भीमराव धोंडे यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बहुचर्चित राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या कारणावरून धनंजय मुंडे यांचं कथित वक्तव्य असलेल्या या व्हिडिओचा निषेध करण्यासाठी सुरेश धस आणि भीमराव धोंडे यांनी आज आष्टीमध्ये मूक मोर्चा काढला होता.

काल शनिवारी निवडणूक प्रचार संपल्यानंतरही धस आणि धोंडे यांनी आष्टीत प्रचंड मोर्चा काढून या घटनेचा आचारसंहितेचा भंग केला. त्यानंतर या मोर्चात धस यांनी भाषणही केले. धनंजय मुंडेंचा निषेध करायचा असेल तर भाजपला मतदान करून त्याचा निषेध नोंदवा, असं आवाहन धस यांनी मोर्चेकऱ्यांना केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. या प्रकरणी विरोधकांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतल्यानंतर दोघांविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!