ह्र्दयद्रावक : ५० रु.चोरल्याचा आरोप सहन न झाल्यामुळे सहावीतील मुलाची रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या

औरंगाबाद – सूरज जनार्दन क्षीरसागर (१२) वर्ष रा शिवाजीनगर असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे.सूरज हा गुरुवारी सकाळी ११वाजेच्या सुमारास शेजारी असणार्या सरला धुमाळ यांच्या किराणा दुकानात सामान घेण्यासाठी बहीणी सोबंत गेला.व त्यानंतर शाळेत गेला.कलावती प्राथमिक विद्या मंदीर असे सूरज च्या शाळेचे नाव आहे.
गुरुवारी त्याची सहामाही परिक्षा होती.पण सरला धूमाळ यांनी सूरज च्या शाळेत जाऊन सर्वांसमक्ष सूरज ने दुकानातील गल्ल्यातून ५०रु.चोरुन नेल्याचा आरोप केला. त्यामुळे सूरज हा शाळेतून पळून गेला. संध्याकाळ पर्यंत त्याचा शोध त्याच्या पालकांनी घेतला.दरम्यान संध्याकाळी पुंडलिकनगर पोलिसांनी सूरज च्या पालकांना फोन करुन कळवले की, सूरज ने रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या केली. या प्रकारा मुळे चिडलेल्या सूरज चे वडिल जनार्दन क्षीरसागर यांनी सरला धूमाळ यांनी अपमानित केल्यामुळे सूरज ने आत्महत्या केल्याचा आरोप करंत पोलिसांकडे तक्रार दिली.
एपीआय घन्नशाम सोनवणे यांनी या प्रकरणाचा छडा लावून सरला धूमाळ यांनी सूरज ला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास एपीआय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुंडलिकनगर पोलिस करंत आहेत.