Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : माहिती अधिकाराचा धाक दाखवून खंडणी मागणारे पिता-पूत्र गजाआड, पाच लाखाची खंडणी मागणे भोवले

Spread the love

औरंंंगाबाद : माहितीच्या अधिकाराचा वापर करून मिळवलेली माहिती व कागदपत्रे व्यापा-याला देण्यासाठी ५ लाखाची खंडणी मागणा-या पिता-पुत्राला पुंडलिकनगर पोलिसांनी बुधवारी (दि.१६) गजाआड केले. जगन सुकाजी किर्तीशाही (वय ५५) मिलिंद जगन किर्तीशाही (वय ३२) दोघे राहणार संसारनगर असे खंडणी बहाद्दर पिता-पुत्राचे नाव असल्याची माहिती पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदीप लालचंद मणकानी (वय ४९, रा.प्लॉट नंबर १६, मित्रनगर, जवाहर कॉलनी) यांचे जवाहर कॉलनी परिसरातील त्रिमुर्ती चौकात असलेले लक्की वाईन शॉप हे दुकान वर्षभरापुर्वी बीड बायपास रोडवरील मास्टर कुक हॉटेल समोर स्थलांतरीत केले होते. दरम्यान, जगन किर्तीशाही, मिलिंद किर्तीशाही या पिता-पुत्राने प्रदीप मनकानी यांच्या दुकानाची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागातून माहितीच्या अधिकारात मिळवत मणकानी यांना ब्लॅकमेल करण्यास सुरूवात केली होती. त्यामुळे ५ ऑक्टोबर रोजी मणकानी यांनी किर्तीशाही पिता-पुत्रास ५० हजार रूपये दिले होते.
दरम्यान, जगन किर्तीशाही व मिलिंद किर्तीशाही यांनी मणकानी यांचे लहान भाऊ राजू मणकानी यांना फोन करून पुन्हा ५ लाख रूपये खंडणी देण्याची मागणी केली. तसेच खंडणीचे पैसे बीड बायपास रोडवरील नंदीनी हॉटेल येथे आणून दिल्यावर तुमचे कागदपत्रे देतो असे सांगितले होते. परंतु मणकानी यांना पैसे देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिस उपायुक्त डॉ. राहुल खाडे, सहाय्यक आयुक्त रविंद्र साळोखे यांच्या मार्गदर्शनाखाली पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक घनश्याम सोनवणे, उपनिरीक्षक विकास खटके, विनायक कापसे, मिरा चव्हाण, जमादार रमेश सांगळे, मच्छिंद्र शेळके, बाळाराम चौरे, शिवाजी गायकवाड, प्रविण मुळे, राजेश यदमळ, दिपक जाधव, जालिंदर मांन्टे, रवि जाधव, नितेश जाधव, कोमल तारे, माया उगले आदींच्या पथकाने सापळा रचून ख्ांडणी मागणा-या पिता-पुत्रास गजाआड केले.

पत्रकार असल्याचे सांगून मागितली खंडणी

जगन किर्तीशाही व मिलिंद किर्तीशाही यांचे साप्ताहिक जयभीम मिशन नावाचे वर्तमानपत्र आहे. या वर्तमानपत्राचे संपादक व पत्रकार असल्याचा धाक दाखवून दोघांनी प्रदीप मणकानी यांना खंडणी मागीतल्याचे उघड झाले. दरम्यान , अटकेत असलेले किर्तीशाही पिता-पुत्र अट्टल खंडणीखोर असून त्यांनी यापुर्वी अनेकांना धाक दाखवून ब्लॅकमेल केले असल्याचे समोर आले असल्याचे पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी सांगितले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!