Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्र विधानसभा २०१९ : भाजपला बहुमतापासून रोखण्याचे सेनेचा मनसुबे तर सेनेच्या मदतीशिवाय सरकार स्थापनेच्या हालचाली !!

Spread the love

महाराष्ट्र विधानसभेच्या जागा वाटपात बरेच ताणून धरूनही अखेर शिवसेनेला १२४ जागांवर समाधान मानावे लागले आहे. त्यामुळे सेनेने आपली लहान भावाची भूमिका स्वीकारली असून भाजपने जागा वाटपात जरी १६४ जागा घेतल्या साल्या तरी त्यांच्या जागांमधून मित्रपक्षांना १८ जागा देण्याची जबाबदारी भाजपवर आहे त्यामुळे प्रत्यक्षात भाजपच्या वाट्याला १४६ जागा येणार आहेत. सेनेकडून गणित असे मांडले जात आहे कि , काही झाले तरी सेनेला १४४ जागा मिळवून बहुमतापर्यँत एकट्याला पोहोचता येणार नाही , त्यामुळे त्यांना बहुमतासाठी सेनेची मदत घ्यावीच लागेल अशी हि अटकळ आहे. पण भाजपला काठावरच्या बहुमताची गरज पडली तर कदाचित सेनेची गरजच पडू नये या दृष्टीने भाजप प्रयत्नशील असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान भारतीय जनता पक्ष-शिवसेना व मित्रपक्षांच्या महायुतीतील प्रत्येक पक्ष नेमका किती जागा लढणार, हा फॉर्म्युला अखेर जाहीर झाला आहे. त्यानुसार, भाजप १६४ व शिवसेना १२४ जागांवर निवडणूक लढणार आहे. मित्रपक्षांना द्यावयाच्या १८ जागा भाजप स्वत:च्या कोट्यातून देणार आहे. आता हे १८ उमेदवार भाजपच्या निवडणूक चिन्हांवर लढणार कि स्वतंत्र चिन्हांवर लढणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. कालच्या पत्रकार परिषदेत बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्याचा निर्णय त्यांच्या पक्षाचे नेते घेतील असे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात चित्र काय असेल हे आताच सांगता येत नाही. चार दिवसात हे चित्र स्पष्ट होईल.

गेल्या अनेक दिवसांपासून  युती होणार की नाही, याबाबतही अनिश्चितता होती. उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली तरी युतीचा निर्णय होत नव्हता. त्यामुळं पक्षातील विद्यमान आमदार, इच्छुक उमेदवार व कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. अखेर सोमवारी रात्री भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या स्वाक्षरीसह महायुती झाल्याचं पत्रक दोन्ही पक्षांच्या वतीनं प्रसिद्ध करण्यात आलं. आणि महायुतीवर शिक्कामोर्तब झालं. मागील वेळेस १५१ जागांवर अडून बसलेल्या व अखेर स्वबळावर लढलेल्या शिवसेनेनं बदलत्या राजकीय परिस्थितीत युतीमध्ये छोट्या भावाची भूमिका मान्य केली आहे. नव्या जागावाटपात काही जागांची अदलाबदल करण्यात आली आहे. त्यात मुंबईतील वडाळा, गोरेगाव, मुंबादेवी, ठाणे व अन्य काही जागांचा समावेश आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!