Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

बिहारमध्ये मुसळधार पावसाचा हाहाकार , १७ जणांचा मृत्यू

Spread the love

महारष्ट्रानंतर बिहारमध्ये मुसळधार पावसामुळे हाहाकार उडाला आहे. राजधानी पाटणासह अनेक जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली असून राज्यात आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला आहे. भागलपूरमध्ये पावसामुळे भिंत कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर पाटणाच्या खगौलमध्ये एका रिक्षावर झाड कोसळल्याने रिक्षातील चार प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे.

बिहारमध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पाटणा, भागलपूरसह राज्यातील १५ जिल्ह्यात पावसाने मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. भागलपूर शहरातील हनुमान घाट, मायागंज आणि महाराज घाट या परिसरात दुर्दैवी घटना घडल्या आहेत.

भिंत कोसळल्याने याखाली दबून लोकांचा मृत्यू झाला आहे. पाटणाच्या खगौल परिसरात मुसळधार पाऊस बरसला. रिक्षावर झाड कोसळल्याने रिक्षातील चार पावसाचा मृत्यू झाला. दानापूर रेल्वे स्टेशनच्या गेटवर उभ्या असलेल्या रिक्षावर झाड कोसळले. यात दीड वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. तसेच तीन महिलांचा मृत्यू झाला आहे. या चारही लोकांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!