Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : टेम्पोसह “डीजे ” ची चोरी करणारे पाच जण अटकेत

Spread the love

जालना रोडवरील रोहिदासनगरात उभा असलेला टेम्पोसह डिजे चोरुन नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. शालीकराम रामभाऊ जाधव (४०, रा. देऊळगाव धनगर, ता. चिखली. जि. बुलढाणा), मिलींद मनोहर आराख (३८), शेख शाकीर शेख रज्जाक (२६, दोघेही रा. प्रियदर्शनी कॉलनी, इंदिरानगर, गारखेडा परिसर), शेख अय्याज शेख मुमताज (२, रा. शंभुनगर, त्रिशरण चौक, गारखेडा परिसर) आणि महंमद साजेद महंमद सादेक (२१, रा. सिल्कमिल कॉलनी, रेल्वेस्टेशन) अशी पाचही जणांची नावे आहेत.

मुकुंदवाडीतील प्रकाश फुलचंद गायकवाड (३२, रा/ रोहिदासनगर, गल्ली क्र. १) यांनी १४ सप्टेंबर रोजी डिजे, जनरेटर, हायड्रोलिक मशीन, स्पिकर यासह इतर महागडे साहित्य टेम्पोमध्ये ठेवले होते. त्यांचा टेम्पो (एमएच-०४-डीडी-८३६८) रात्री लॉक करुन परिसरातील डिपीजवळ उभा करण्यात आला होता. मात्र, मध्यरात्री या पाचही जणांनी साहित्यासह त्यांचा टेम्पो बनावट चावीच्या सहाय्याने लांबविला. १५ सप्टेंबर रोजी सकाळी दहाच्या सुमारास हा प्रकार समोर आल्यावर गायकवाड यांनी मुकुंदवाडी पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली. याप्रकरणाचा तपास करत असताना उपनिरीक्षक राहुल बांगर यांनी पाचही जणांना पकडले. त्यांच्याकडून चोरीला गेलेले सर्व साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.

ही कारवाई उपायुक्त डॉ. राहुल खाडे, सहायक पोलिस आयुक्त गुणाजी सावंत, पोलिस निरीक्षक उध्दव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राहुल बांगर, सहायक फौजदार कौतिक गोरे, शिपाई कैलास काकड, सुनील पवार, अस्लम शेख, मनोहर गिते, विजय चौधरी, प्रकाश सोनवणे, संतोष भानुसे आणि सुधाकर पाटील यांनी केली.

खिडकीचे गज कापून चोरट्याने ५६ हजाराचा ऐवज लांबविला

औरंंंगाबाद : शहानुरवाडी परिसरातील देवानगरी येथे राहणाNया डॉ. सरोज रामलिंग बेंबळकर-पांडे (वय ५६) यांचे घर फोडून चोरट्यांनी ५६ हजार ५०० रूपये विंâमतीचा ऐवज चोरून नेला. डॉ. बेंबळकर-पांडे यांच्या घराचे बाथरूमच्या खिडकीचे गज कापून चोरट्यांनी २० सप्टेंबरच्या रात्री कापून घरात प्रवेश केला. चोरट्याने डॉ.बेंबळकर-पांडे यांच्या घरातून सोन्याचे मणिमंगळसूत्र, पँडल, रोख रक्कम ३ हजार ५०० रूपये आणि मोबाईल असा एवूâण ५६ हजार ५०० रूपये विंâमतीचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी डॉ.सरोज बेंबळकर-पांडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून चोरट्याविरूध्द उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक फौजदार कल्याण शेळके करीत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!