Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

काँग्रेसची ५० जागांसाठीची पहिली यादी २० सप्टेंबरला होणार जाहीर : बाळासाहेब थोरात

Advertisements
Advertisements
Spread the love

राष्ट्रवादी काँग्रेसने बीड जिल्ह्यातील पाच उमेदवारांची पहिली यादी घोषित केल्यानंतर काँग्रेसनेही आपल्या  ५० उमेदवारांची पहिली यादी २० सप्टेंबर रोजी जाहीर होणार असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.

Advertisements

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह मित्रपक्षांच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. काँग्रेस १२५, राष्ट्रवादी १२५ आणि मित्रपक्ष ३८ जागांवर लढणार आहे. आता काँग्रेसची पहिली यादी २० सप्टेंबरला येईल असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.

Advertisements
Advertisements

दरम्यान काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून मोठ्या प्रमाणावर बड्या नेत्यांची गळती झाल्यामुळे या दोन्हीही पक्षांकडून कुणा कुणाला उमेदवारी मिळणार आहे याची कार्यकर्त्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजप -सेनेचे जागावाटप अद्याप फायनल होत नसल्याने महायुतीचे काय होणार ? याची चर्चा सर्वत्र रंगली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!