Aurangabad : जिल्हा गणेश महासंघाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन

औरंगाबाद जिल्हा गणेश महासंघ उत्सव समितीच्या वतीने यंदाच्या गणेशोत्सवा मध्ये विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन जिल्हा गणेश महासंघ उत्सव समितीच्या वतीने यंदाच्या गणेशोत्सवा मध्ये विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या मध्ये प्रसिद्ध व्याख्याते नितीन बानगुडे पाटील यांचे व्याख्यान तसेच “आयुष्यावर बोलू काही ” या बहारदार सामाजीक कार्यक्रमा सोबतच अनेक कार्यक्रम आयोजीत करण्यात आलेली असल्याची माहीती संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार आणि उत्सव समितीचे अध्यक्ष राजेंद्र जंजाळ कार्याध्यक्ष राजेंद्र दाते पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या प्रसंगी बोलतांना अध्यक्ष राजेंद्र जंजाळ म्हणाले, शुक्रवार दिनांक सहा सप्टेंबर सायंकाळी सात वाजता नितीन बानगुडे पाटील यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. टी. व्ही. सेंटर येथील जिजाऊ चौकात हा कार्यक्रम होणार आहे. शनिवारी संदीप खरे, सलील कुलकर्णी यांच्या आयुष्यावर बोलू काही या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तापडिया नाट्य मंदिरात सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे. सोमवारी दिनांक ९ सप्टेंबर जिल्हा परिषद मैदानावर भव्य ढोल ताशा वादन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी अकरा वाजता या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. मंगळवारी जिल्हा परिषद मैदानावरच भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी दोन वाजता या कुस्ती स्पर्धेला प्रारंभ होणार असून, महाराष्ट्र केसरी पैलवान नरसिंग यादव यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती असणार आहे. बुधवारी दिनांक ११ सप्टेंबर गणेश महासंघ कार्यालय, समर्थनगर येथून कोल्हापूर, सांगली, सातारा येथील पूरग्रस्तांना मदत पाठवण्यात येणार आहे. गुरुवारी अनंत चतुदर्शीच्या दिवशी भव्य विसर्जन मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. राजाबाजार ग्राम दैवत संस्थान गणपती येथून सकाळी दहा वाजता या मिरवणुकीला मान्यवरांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. पत्रकार परिषदेला कार्याध्यक्ष राजेंद्र दाते पाटील माजी अध्यक्ष अभिजित देशमुख, राजुकाका नरवडे,मिथुन व्यास, शिवाजी लिंगायत, संदीप शेळके, अनिकेत पवार आदींची उपस्थिती होती