Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मुंबई सामूहिक बलात्कार प्रकरण : पीडितेच्या भावाला शिवीगाळ करून अवमानास्पद वणूक देणाऱ्या पोलीस निरीक्षकाविरुद्ध ऍट्रॉसिटी

Spread the love

मुंबई चूनाभट्टी गॅंगरेपप्रकरणी पोलीस अधिकारी दीपक सुर्वेविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. बहिणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणातील तापसबद्दल माहिती मागण्यासाठी गेलेल्या भावाला दीपक सुर्वे यांनी जातीवाचक शिवीगाळ केली होती. तसेच अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. चुनाभट्टी पोलीस स्टेशनमध्ये दीपक सुर्वेविरुद्ध अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दीपक सुर्वेंवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.

दिलीप सुर्वे हे नेहरूनगर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत आहेत . घटनेच्या दिवशी त्यांच्याकडे चुनाभट्टी पोलीस स्टेशनचा अतिरिक्त भार देण्यात आला होता. सदर प्रकरणी तापसबाबत माहिती घेण्यासाठी पीडितेचा भाऊ पोलीस स्टेशनमध्ये गेला होता. दीपक सुर्वे यांनी पीडितेच्या भावाला जातीवाचक शिवीगाळ केली. एवढेच नाही तर पीडितेच्या भावाला हाकलून दिले. दरम्यान, चुनाभट्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक महिन्यांपूर्वी जालना जिल्ह्यातील  १९ वर्षीय तरुणीवर चौघांनी सामूहिक बलात्कार केला होता. नराधमांनी तरुणीला ड्रग्जही दिले होते. औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र, आरोपी अजूनही मोकाट आहे. पोलिसांकडे पुरावे असून ते आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोप पीडितेच्या नातेवाईकांनी केला आहे.

याशिवाय या घटनेचा प्रारंभिक तपास करताना मुंबईच्या पोलिस निरीक्षक श्रीमती शिर्के तसेच घाटी रुग्णालयातही उपचार करणाऱ्या  डॉक्टरनेही  पीडितेच्या आई-वडिलांना आणि भावाला नीट वागणूक दिली नसल्याचा आरोप लक्षात घेऊन त्यांची चौकशी करावी आणि त्याआधारे योग्य ती कारवाई करण्याचे निर्देशही महिला आयोगाने दिले आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!