Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IOC : गॅस सिलिंडरच्या किमतीत झाली वाढ …

Spread the love

ऑइल कंपन्यांनी आज दिनांक १ सप्टेंबरपासून  अनुदान नसलेल्या स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरची किंमत १६ रुपयांनी वाढवलीय. तर इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड ( IGL )नं CNGच्या किमतीत ५० ते ५५ पैसे प्रति किलो वाढ केलीय. यामुळे आता कार चालवणं महाग झालंय. देशातली सर्वात मोठी तेल कंपनी इंडियन ऑइल काॅर्पोरेशन ( IOC )च्या वेबसाइटप्रमाणे राजधानीत दिल्लीत आता सबसिडी नसलेला १४.२ किलोग्रॅमचा स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर ५९० रुपयांना मिळेल. ऑगस्टमध्ये याची किंमत ५७४.५० रुपये होती.

मुंबईत हा सिलेंडर ५४६.५० रुपयांऐवजी ५६२ रुपयांना मिळेल. कोलकत्त्यात ६०१ रुपयांचा सिलेंडर ६१६.५० रुपयांना मिळेल. चेन्नईत याची किंमत ५९०.५० रुपये होती. आता ती ६०६.५० रुपये आहे. याशिवाय १९ किलोग्रॅम सिलेंडरची किंमत मुंबईत १००८.५० रुपये, दिल्लीत १०५४.५० रुपये, कोलकत्त्यात १११४.५० रुपये, चेन्नईत ११७४.५० रुपये आहे. गेले दोन महिने सिलेंडरच्या किमतीत लागोपाठ घसरण झाल्यानंतर ही वाढ झालीय.

सणासुदीच्या दिवसांत स्वयंपाकाचा गॅस महाग झाल्यानं जनता चिंतेत पडलीय. आता गणेशोत्सव, नंतर नवरात्र, दसरा, दिवाळी या काळात स्वयंपाकाच्या गॅसचा वापर जास्त होत असतो. दिल्ली-एनसीआरमध्ये IGL नं CNG चे दर वाढवलेत. IGL नं दिल्ली-एनसीआर, नोएडा, गाजियाबाद आणि गुरग्राम इथे सीएनजीचे दर वाढवलेत. दिल्ली, रेवाडी, गुरुग्राम आणि करनाल इथे ५० पैसे तर नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाजियाबाद इथे सीएनजी ५५ पैशांनी महाग झालीय.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!