Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

उदयनराजे यांचे पाऊल पडतेय भाजपमध्ये , मोदींच्या उपस्थितीत करणार प्रवेश , माजी खासदार धनंजय महाडिकही भाजपच्या वाटेवर

Spread the love

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राजकीय हालचालींनी वेग पकडला आहे. पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला सर्वात मोठा धक्का बसणार, हे आता जवळपास निश्चित आहे. कारण साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशाबद्दल सर्वत्र जोरदार चर्चा आहे. मात्र उदयनराजेंच्या भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तारखेवरून नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. दरम्यान भाजपचे जंक्शन गाठण्यासाठी शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांचे कनेक्शन उदयन राजे वापरत असल्याचे सांगण्यात येत आहे . या पार्श्वभूमीवर भिडे यांनी उदयनराजेंची भेट घेऊन चर्चा केली.

दरम्यान कोल्हापूरमधील राष्ट्रवादीचे माजी खासदार धनंजय महाडिक हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होत्या. मात्र महाडिक यांच्याकडून वारंवार या चर्चा फेटाळण्यात आल्या. पण आज अखेर आपण भाजपमध्ये जाणार असल्याचं महाडिक यांनी जाहीर केलं आहे.

केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत सोलापूरमध्ये उदयनराजे भाजपमध्ये प्रवेश करतील, असं बोललं जात होतं. मात्र उदयनराजे अमित शहा यांच्या नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत थेट दिल्लीत भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी माहिती आता सूत्रांकडून मिळाली आहे. जोरदार शक्तीप्रदर्शनासह उदयनराजेंना पक्षात घेण्याचा भाजपचा विचार आहे.

दरम्यान, उदयनराजे भोसले राष्ट्रवादीच्या खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे. उदनराजेंनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास राष्ट्रवादी बॅकफूटवर जाण्याची शक्यता आहे. कारण साताऱ्यासह महाराष्ट्रातील इतर भागातही उदयनराजेंना मानणारा एक मोठा वर्ग आहे.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!