Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : रिझर्व्ह बॅककेतून बोलत असल्याचे भासवून अधिक्षकाला पावणेदोन लाखाला गंडा

Spread the love

टेली फिशर चा नवीन फंडा , ९ महिन्यांपूर्वीची घटना

औरंगाबाद – घाटी रुग्णालयात अधिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या अधिकार्‍याला एका भामट्याने १७ डिसेंबर २०१८ रोजीआपण रिझर्व्ह बॅंक आॅफ इंडीयातून बोलत आहोत असे म्हणंत तुमचे एटीएम कार्ड बंद होणार असल्याचे कारण सांगून तीन वेगवेगळ्या नंबरवरुन फोन करून त्यांच्याकडून आवश्यक ती माहिती घेऊन तब्ब्ल १ लाख ७४ हजारांना फसवले. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल झाला आहे.

बाबूराव सपकाळ (६१) रा. एन ७ सिडको असे फसवणूक झालेल्या अधिकार्‍याचे नाव असून भामट्याने फोन करुन फसवल्यानंतर रिझर्व बॅंकेकडून पैसे परत मिळण्याची वाट पाहून मंगळवारी ६ ऑगस्ट  २०१९ रोजी गुन्हा दाखल झाला.

सपकाळ यांचे जाधववाडी परिसरातील स्टेट बॅंक आफ इंडीया मधे खाते आहे.त्यांचे ए.टी.एम. कार्ड बंद होत असल्याचा फोन एक फोन आला.सपकाळ यांना त्या भामट्याने रिझर्व्ह बॅंकेतून बोलत असल्याचे सांगितले. आर.बी.आय.चे नाव भामट्याकडून ऐकल्यानंतर त्याने सांगितलेल्या कृती सपकाळ यांनी केल्या.  भामट्यानेही नेहमी घडंत असणार्‍या गुन्ह्या प्रमाणे ओटीपी नंबर पाठवून माहिती न विचारता वेगवेगळै मेसेज पाठवले. या कृतीला सपकाळ बळी पडल्यानंतर त्यांच्या खात्यातून १ लाख ७४ हजार ९९० रु. लंपास झाल्याचे मेसैज बॅंकेकडून आले. त्यांनी पुन्हा भामट्याला फोन केला असता तुमचे पैसे  पुन्हा खात्यात भरले जातील असे सांगितले. या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक कैलास देशमाने आणि त्यांचे कर्मचारी विवेकानंद औटी करंत आहेत

आपलं सरकार

Click to listen highlighted text!