Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Police : सात पोलीस निरीक्षकांसह ८ पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या

Spread the love

औरंगाबाद  पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्या आदेशाने सोमवारी (दि.५) शहर पोलिस दलात खांदेपालट करण्यात आला. शहर पोलिस दलातील सात पोलिस निरीक्षकांसह, ७ उपनिरीक्षक आणि एक सहाय्यक पोलिस निरीक्षकाची बदली करण्याचे आदेश पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी जारी केले आहेत.

गेल्या काही दिवसापासून शहर पोलिस दलातील अधिका-यांच्या बदल्या होणार असल्याची चर्चा सुरू होती. या चर्चेला सोमवारी पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्या आदेशाने मुर्त रूप देण्यात आले. सिटीचौक पोलिस ठाण्याचे निरीक्षक दादासाहेब शिनगारे यांची शहर वाहतूक शाखा-१, वाहतूक शाखा-१ चे निरीक्षक विठ्ठल पोटे यांची सातारा पोलिस ठाण्यात, विभागीय चौकशी कक्षाच्या निरीक्षक राजश्री आडे यांची दौलताबाद पोलिस ठाण्यात, पोलिस आयुक्तांचे जनसंपर्क  अधिकारी सचिन इंगोले यांची हर्सुल पोलिस ठाण्यात, हर्सुल पोलिस ठाण्याचे निरीक्षक मुंकुंद  देशमुख यांची पोलिस आयुक्तांचे जनसंपर्क  अधिकारी, सातारा पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल आडे यांची विभागीय चौकशी कक्षात तर पोलिस नियंत्रण कक्षातील फईम हकीम हाश्मी यांची मनपा अतिक्रमण हटाव विभागात बदली करण्यात आली आहे. जिन्सी पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक साईनाथ गिते यांची दौलताबाद पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.

पोलिस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षकांसोबतच उपनिरीक्षकांच्या बदल्या देखील करण्यात आल्या. त्यामध्ये सातारा पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक सागर कोते यांची एमआयडीसी वाळुज, एमआयडीसी सिडकोचे उपनिरीक्षक ताहेर अमीर पटेल यांची वाहतूक शाखा, छावणीचे उपनिरीक्षक राहुल चव्हाण यांची सायबर पोलिस ठाण्यात, सिडकोच्या उपनिरीक्षक मिना बकाल यांची वाहतूक शाखा, मुकुंदवाडी चे उपनिरीक्षक अमोल म्हस्के यांची वाहतूक शाखा, पुंडलिकनगरचे उपनिरीक्षक आरीफ बद्रुद्दीन शेख यांची दौलताबाद पोलिस ठाण्यात, छावणीचे उपनिरीक्षक सचिन मिरधे यांची वाळुज पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!