Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मराठा समाजाच्या प्रलंबीत मागण्या तात्काळ मान्य करा -मराठा क्रांती मोर्चाची मागणी

Spread the love

मराठा समाजाने आपल्या विविध मागण्या साठी राज्य भरात भव्य असे मूक मोर्चे काढून  आपल्या मागण्या अभिनव पद्धतीने शासन दरबारी पोहचवल्या होत्या परंतु त्या पैकी बहुसंख्य मागण्या प्रलंबीत असून  मराठा आरक्षणा साठी हॊतात्म्य पत्करलेल्या त्या ४२ शहिद तरुणांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० लाख रुपये आणि त्यांच्या घरातील प्रत्येकी एकास अर्हतेप्रमाणे एक शासकीय नोकरीं देण्याचे शासनाने मान्य केलेले असूनही औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर येथील हुतात्मा शहीद स्व. काका साहेब शिंदे यांचेच एकमेव प्रकरण शासनाकडे असून  उर्वरीत तरुणांचे काय ? असा महत्वपूर्ण  सवाल आज मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांचे समक्ष उपस्थित करण्यात आला.

शेकडो जणांचा सहभाग असलेल्या मराठा समन्वयकांच्या पैकी फक्त पाच जणांना शिष्ट मंडळास परवानगी दिली असता मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मराठा आरक्षणाचे जेष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील, किशोर चव्हाण, सरदार विजय काकडे, सुरेश वाकडे, सतीश वेताळ आदी सह काही हुतात्म शहीद कुटुंबियांचे पालक सुध्दा या भेटी दरम्यान उपस्थित होते.

आपल्या मागण्या बाबत विभागीय आयुक्तांना माहीती देतांना आरक्षण आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या १३,७०० पेक्षाही जास्त तरुणांना दिलासा देण्यासाठी शासनाने त्यांच्या वरील गुन्हे परत  घेण्याची घोषणा केली होती आणि त्या घोषणांची अद्याप पूर्तता झालेली नसल्याचे सुद्धा विभागीय आयु क्ताचें निदर्शनास आणून देण्यात आले.  स्व. आण्णा साहेब पाटील आर्थीक विकास महामंडळ यांचे वतीने देण्यात येणाऱ्या कर्ज प्रकरणात राष्ट्रीयकृत बँका अजिबात सहकार्य तथा प्रोत्साहन देत नसल्यामुळे कर्जाचे वितरण करणे बाबत अक्षम्य दुर्लक्ष होत असल्यामुळे मराठा तरुणांमध्ये नैराश्य पसरले आहे.  राज्यात अनेक जिह्यात अद्याप मराठा विध्यार्थी वसतिगृहाची सुरुवात झाली नसून  ती सुद्धा तात्काळ करणे आवश्यक आहे.

कोपर्डी घटनेतील आरोपी बाबत शिक्षा तर जाहीर झाली परंतु हे प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबीत असून  त्यावर शासनाने तात्काळ अंमलबजावणी होणे कामी कायदेशीर बाबींची सुरुवात तात्काळ करावी ही सुध्दा मागणी शिष्टमंडळाने केली आहे.

विभागीय आयुक्त कार्यालयात उपस्थित असलेल्या समाज बांधवा मध्ये प्रामुख्याने अशोक खानापुरे, आत्माराम शिंदे, मनोज गायके, अभिजीत देशमुख, रमेश गायकवाड, मिलींद साखळे, प्रशांत शेळके, बाळासाहेब औताडे, शिवाजी जगताप, ज्ञानेश्वर अंभोरे, नितीन कदम,अंकत चव्हाण, बाबासाहेब दाभाडे, सुकन्या भोसले, माधुरी पवार, रेखा वाहाटुले, योगेश औताडे, रवींद्र वाहाटुले, प्रा. राजकुमार गाजरे, नितीन पाटील, तुकाराम मोरे, कमलाकर शिंदे, अजय गंडे, वैभव बोडखे, शिवाजी दाभाडे, सुनील खासकर,प्रदीप हारदे, सुशील बकाल, गणेश सोनावणे, पंकज नवले, सुनील खंबाट, कुणाल घंटे, अभिजीत काकडे, विशाल वेताळ, नारायण अंभोरे, विठ्ठल खांडेभराड, निलेश शेलार, अक्षय पाचपीले, सचिन शिंदे, संदीप जाधव, विलास औताडे, संदीप शेळके, आदर्श कुंटे, यश नवले, शिवाजीराव चव्हाण, राहुल भोसले आदी सह शेकडो समाज बांधव उपस्थित होते.

या बाबतीत मराठा क्रांती मोर्चाचा असा निर्णय झाला कि, राज्य शासनाने ८ ऑगस्ट पर्यत सर्व प्रलंबीत मागण्या मान्य न केल्यास दिनांक ९ ऑगस्ट क्रांती दिना दिवशी सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजे पर्यत राज्यभर आपआपल्या तालुका तहसीलदार कार्यालया समोर, जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शनाचा भव्य कार्यक्रम आयौ जीत करण्यात आला असुन निर्माण झालेल्या स्थितीस शासन सर्वस्वी जवाबदार राहील असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!