Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

” तू एकटी नाहीस ..!!…सर्व औरंगाबाद कर तुझ्या बरोबर आहोत…!!” : उन्नाव पिडीतेसाठी औरंगाबादेत निदर्शने

Spread the love

उन्नाव ( उत्तर प्रदेश) येथील बलात्कारितेस , आपले कुटुंब गमावून ही न्याय मिळत  नाही..!!  कारण ती सत्तेत बसलेल्या हैवानांशी लढते आहे… हि भूमिका घेऊन औरंगाबादेतील  मानवतावादी कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन उन्नाव पीडितेच्या समर्थनार्थ क्रांतिचौकात निदर्शने करण्यात आली.
अशा वेळी आपण सर्व तिच्या पाठीशी खंबीर पणे उभे आहोत, असा संदेश देवूयात….

जीवन – मरणाशी संघर्ष करणाऱ्या या पिडी तेस लखनऊ ऐवजी दिल्लीचे AIIMS हॉस्पीटल मध्ये हलवावे , ” बेटी बचावो ” ची घोषणा देणारे भाजपा सरकार ने आता तरी या आमदारास (आ. कुलदीप सिंह) पक्षातून हाकलून लावावे, कारण त्यास जेल मध्ये राहूनही सत्तेचे संरक्षण मिळते आहे.
या अमानुष प्रकरणाची, निश्चित कालमर्यादेत तपासणी करून, आमदारांसह, सर्व जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशीही मागणी आहे…

पिडीतेशी सह वेदना व्यक्त करण्यासाठी, स्वराज अभियान, स्वराज इंडिया, मराठवाडा लेबर युनियन, कागद काच पत्रा कामगार संघटना, भा. क. प., मा. क. प., सजग महिला संघटना, एस. एफ. आय., ए. आय. एस. एफ., बांधकाम कामगार संघटना , औषध विक्रेते संघटना, इ संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी स्वराज इंडिया चे साथी सुभाष लोमटे, अण्णा खंदारे, ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते का. मनोहर टाकसाळ, प्रा. राम बाहेती, अड. अभय टाकसाळ, का. मधुकर खिल्लारे, मा. क. प.चे का. भगवान भोजने, का. फोपसे, डॉ. रश्मी बोरीकर, सुलभा खंदारे , अड.सचिन गंडले, शेख अन्वर, अड. एन. बी.शाह, लोकेश कांबळे, मुकुल निकाळजे, मराठवाडा लेबर युनियन चे साथी देविदास किर्तीशाही, अरविंद बोरकर, देवचं द आल्हा ट, कागद काच पत्रा कामगार संघटनेच्या आशाबाई डोके, केशरबाई भालेराव, गयाबाई जोगदंड, संगीता लोंढे, अशोक पगारे, जगणं भोजने, उत्तम जाधव, उत्तम वाहुळे, मनोहर अकोलकर, कारभारी जेजुरकर, इ चा प्रमुख सहभाग होता.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!