Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

भिवंडीतही मुसळधार , ३०० जणांना अग्निशमन दलाने सुखरूप बाहेर काढले

Spread the love

मुसळधार पावसाने भिवंडी आणि आसपासच्या परिसराला झोडपून काढल्याने ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी साचले होते. कोनगाव परिसरातील खाडी किनारी असलेल्या ड्रीम कॉम्प्लेक्समध्ये चार ते पाच फूट इतके पाणी भरले होते. अग्निशमन दलाने धाव घेत येथील २०० ते ३०० जणांना सुखरूप बाहेर काढले असून काही नागरिक घरातून बाहेर पडण्यास तयार नव्हते. पिंपळासगावामध्येही पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ उडाली होती.

भिवंडी इदगाह रोड, वंजारपट्टी, तीनबत्ती, भिवंडी बायपास रोड, खोणीगाव या भागातही मोठ्या प्रमाणात पाणी साचले असल्याची माहिती भिवंडी आपत्कालीन कक्षाकडून देण्यात आली. इदगाह रोडवरील ५० ते ६० घरांमध्ये पाणी घुसले होते. भिवंडी तालुक्यातील वारणा नदीत शुक्रवारी रात्री कैलास भगत हा व्यक्ती वाहून गेला होता. रात्री शोध घेऊनही सापडला तो नाही. शनिवारी सकाळी भगत याचा मृतदेह मिळाला असल्याची माहिती भिवंडीच्या तहसीलदारांनी दिली. मात्र तो नदीत कसा पडला याबाबत कोणतीही माहिती नाही.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!