पक्षाला अडचणीत आणू नका – खा.इम्तीयाज जलील यांच्याकडून पक्षातील जेष्ठ कार्यकर्त्यांची कान उघडणी

जयश्रीराम प्रकरणात शहरात दोन पोलिस ठाण्यांमधे गुन्हे दाखल झाल्यानंतर खा. इम्तीयाज जलील यांनी पक्षातील काही जेष्ठ कार्यकर्त्यांची खरडपट्टी काढली. पक्षाला अडचणीत आणू नका अशा शब्दात कान उघडणी केल्याची माहिती खा.इम्तीयाज जलील यांनी दिली. गेल्या चार दिवसात घडलेल्या घटनांनंतर संपूर्ण शहर ढवळून निघाले. पोलिसांनी दिवसरात्र नाकाबंदी सुरु केली आहे. या घटनांचा आढावा घेऊन पक्ष कार्यकर्त्यांची कान उघडणी झाल्याची माहिती मिळते. खासदार म्हणून निवडून आल्यानंतर आपण शहर विकासाचा ध्यास घेतला असून त्यासाठी सतत प्रयत्न सुरु असतांना अशा दुर्देवी घटना घडाव्यात ही खेदाची गोष्ट असल्याचे ते म्हणाले.