Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Congress : राहुल गांधी आपल्या निर्णयावर ठाम , काँग्रेसचे अध्यक्षपद नकोच

Spread the love

काँग्रेस अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याच्या निर्णयावर आपण ठाम असल्याचं पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी स्पष्ट केलं आहे. ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी विनंती करुनदेखील राहुल गांधी यांनी माघार घेण्यास नकार दिला आहे. अशोक गेहलोत यांनी ट्विट करत सध्याच्या परिस्थितीत राहुल गांधी पक्षाचं नेतृत्त्व करण्यात सक्षम असल्याचं म्हटलं होतं.

‘सध्या जी परिस्थिती आहे ती पाहता फक्त राहुल गांधीच पक्षाचं नेृत्तत्व करु शकतात असं आम्हाला वाटतं, देशाच्या भल्याकरिता तसंच देशवासियांसाठी असणाऱ्या त्यांच्या बांधिलकीची तुलना होऊ शकत नाही’, असं अशोक गेहलोत यांनी म्हटलं होतं.

अशोक गेहलोत यांच्या या ट्विटवर प्रतिक्रिया देताना राहुल गांधी यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं की, ‘मी माझा निर्णय घेतला आणि तुम्हा सर्वांना त्याची माहिती आहे’. काँग्रेसशासित राज्यांचे मुख्यमंत्री भेट घेण्याच्या काही वेळ आधी राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केलं. राहुल गांधी यांची भविष्यात नेमकी काय भूमिका असणार आहे यावरुन व्यक्त होणारे तर्क-वितर्क तसंच यावरुन सुरु असलेल्या राजीनाम्याचं सत्र याच पार्श्वभुमीवर ही बैठक होणार आहे.

दरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीआधी बोलताना ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राहुल गांधीच काँग्रेसचं नेतृत्त्व करु शकतात असं वक्तव्य केलं आहे. राहुल गांधी यांनी राजीनाम्याचा प्रस्ताव सादर केल्यापासून पहिल्यांदाच काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं होतं की, ‘काँग्रेस-शासित सर्व राज्यांचे मुख्यमंत्री राहुल गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेणार आहेत. याआधीही आम्ही सर्व मुख्यमंत्र्यांनी २०१९ लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी आम्हा सर्वांची असल्याचं सांगितलं होतं’.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!