Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Rajsthan : वादळात मंडप कोसळून झालेल्या दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू तर २० हुन अधिक जखमी

Advertisements
Advertisements
Spread the love

राजस्थानमधील बाडमेर येथे रविवारी वादळी पावसामुळे अनेकांचे बळी गेले. जिल्ह्यातील एका गावात धार्मिक कार्य सुरू असताना वादळी पावसामुळे मंडप कोसळला. या अपघातात १४ जण मृत्युमुखी पडले तर २० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या नहाटा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Advertisements

जसोल नावाच्या गावात ही दुर्घटना घडली. येथे रामकथेचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमस्थळी अचानक वादळी वाऱ्यांसह पाऊस सुरू झाला. मंडप कोसळला आणि वीज पुरवठा सुरु राहिल्याने लोकांचा शॉक लागून मृत्यू झाला. याबाबतची अधिक माहिती सध्या मिळालेली नसल्याचे ए एन आय च्या वृत्तात म्हटले आहे.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!