Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मध्य प्रदेश : रामकथा ऐकताना झाली दुर्घटना , गेला १४ जणांचा जीव !! मदतकार्य प्रगतीपथावर ….

Spread the love

राजस्थानमधील बाडमेरच्या जसोलमध्ये राम कथा वाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी वादळी पावसामुळे मंडप कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये १४ जण ठार झाले. या घटनेमध्ये जवळपास २४ जण जखमी झाले असून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी दुख: व्यक्त केले असून जखमींवर उपचार करण्याचे आदेश दिले आहेत. वादळ आणि पावसामुळे मंडप कोसळला आणि हि दुर्घटना घडली असे सांगण्यात येत आहे .

या दुर्घटनेसंदर्भात डी.एम. हिमांशु गुप्तांनी सांगितले की, दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मंडपात अधिक तर वृद्ध महिला आणि पुरुष होते, जे रामकथा ऐकायला आले होते. यात २४ जण जखणी आहेत, तर त्यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

पाऊस सुरूहोता आणि अशातच मंपड पडण्यासोबतच विजेच्या ताराही तुटल्या आणि त्यामुळे मंडपात सगळीकडे करंट पसरला. त्यामुळे अनेक जणांना करंट लागला असल्याची शक्यता आहे. पण, संपूर्ण तपास झाल्यावरच खरे कारण समोर येईल असे अधिकाऱ्यांचे म्हणने आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!