Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

काँग्रेसचे विधानसभेचे तिकीट मिळवायचेय ? मग ६ जुलै पर्यंत अर्ज करा , प्रदेश काँग्रेसचे आवाहन

Advertisements
Advertisements
Spread the love

आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीकरिता ६ जुलैपर्यंत अर्ज पाठवता येणार असल्याचं काँग्रेस पक्षाने जाहीर केलं आहे. तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी सगळ्याच पक्षांनी कंबर कसली आहे. विधानसभेच्या तयारीसाठी सर्व पक्षांमध्ये महत्त्वाच्या बैठकी घेण्याचं सत्र सध्या सुरू आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नियोजनाला सुरूवात केली आहे. विविध पातळ्यांवर तयारी सुरू झाली आहे. प्रदेशाध्यक्ष नियमितपणे विविध पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन नियोजनाचा आणि पूर्व तयारीचा आढावा घेत आहेत.

Advertisements

याचाच एक भाग म्हणून प्रदेश काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांचे लेखी अर्ज मागवले आहेत. इच्छुकांनी आपले अर्ज ६ जुलै २०१९ पर्यंत ‘महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, टिळक भवन, काकासाहेब गाडगीळ मार्ग, दादर पश्चिम, मुंबई’ येथे पाठवायचे आहेत. अशी माहिती काँग्रेसकडून देण्यात आली आहे.

Advertisements
Advertisements

काँग्रेसच्या या घोषणेनंतर आता विधानसभेसाठी कोण अर्ज करणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकांमध्ये घवघवीत यश मिळवल्यानंतर आता भाजपने पुढचं टार्गेट विधानसभा निवडणुकांचं ठेवलं आहे. त्यासाठी पक्षात जोरदार तयारी सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमिवर मुख्यमंत्र्यांकडून बैठकांचं आयोजन करण्यात येत आहे.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!