Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ICC World Cup 2019: शिखर धवन लवकरच मैदानात परतेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींना विश्वास

Spread the love

भारताचा सलामीवीर शिखर धवनला अंगठ्याच्या दुखापतीमुळे विश्वचषकातून माघारी परतला आहे. भारतीय संघातून बाहेर पडताना धवन भावुक झाला होता. प्रत्येक खेळाडूचे विश्वचषकात खेळण्याचे स्वप्न असते, तसे ते धवनचेही होते. पण दुखापतीमुळे धवनला आता विश्वचषकात खेळण्याची संधी मिळेल की नाही, याबाबत सांगता येत नाही. धवन हा या गोष्टीमुळे निराश झाला असला तरी तो लवकरच मैदानात परतेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या लढतीत शिखर धवनने शानदार शतकी खेळी केली होती. त्याने रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहलीसमवेत केलेल्या मोठ्या भागीदाऱ्यांमुळे भारतीय संघाला साडेतीनशेपार मजल मारता आली होती. मात्र या खेळीदरम्यान पॅट कमिन्सचा एक उसळता चेंडू हातावर बसून शिखरच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. दुखापत बळावल्याने तो क्षेत्ररक्षणालाही येऊ शकला नव्हता.

दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या बलाढ्य संघांविरुद्घचे सामने जिंकून वर्ल्ड कप स्पर्धेत जोरदार सुरुवात करणाऱ्या भारतीय संघाला जबरदस्त धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत घणाघाती शतकी खेळी करणारा डावखुरा सलामीवीर शिखर धवन दुखापतग्रस्त झाला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध फलंदाजी करताना हाताला झालेल्या दुखापतीमुळे धवनला तीन आठवडे संघाबाहेर राहावे लागणार होते, पण आता त्याला स्पर्धेलाच मुकावे लागणार आहे.

मोदी यांनी धवनसाठी खास एक ट्विट केले आहे. यामध्ये मोदी म्हणाले आहेत की, ” खेळपट्टीला नक्कीच तुझी आठवण येत असेल. तु लवकरच फिट होशील, अशी मला आशा आहे. तु पुन्हा एकदा लवकर मैदानात परतशील आणि भारताच्या विजयात योगदान देशील.”

दरम्यान,  दुखापतीतून सावरून तो 10-12 दिवसांत तो कमबॅक करेल असा विश्वास व्यक्त केला जात होता.”त्याच्या अंगठ्याला प्लास्टर करण्यात आले आहे आणि पुढीत काही दिवस ते तसेच ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्याच्या दुखापतीची चिकिस्ता करण्यात येईल. आशा करतो की तो साखळी फेरीच्या मध्यंतराच्या सत्रात पुनरागमन करेल आणि उपांत्य फेरीचा सामनाही खेळेल,” असे सांगण्यात आले होते.
भारताच्या वर्ल्ड कप मोहिमेला मोठा धक्का बसला. अंगठ्याला दुखापत झाल्यामुळे भारताचा सलामीवीर शिखर धवनला स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे. त्यामुळे रिषभ पंतचा मार्ग मोकळा झाला आहे. धवन तीन आठवड्यात दुखापतीतून सावरेल असे सांगण्यात येत होते, परंतु तो सावरणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्यानं उर्वरित स्पर्धेतून माघार घेतली आहे. IANSला बीसीसीआयच्या सूत्रांनी ही माहिती दिली. ”धवन वर्ल्ड कप खेळण्यासाठी फिट नसून त्याला रिकव्हर होण्यासाठी दोन आठवड्यांपेक्षा अधिक कालावधी लागेल. त्यामुळे तो वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार घेत आहे,” असे सूत्रांनी स्पष्ट केले.

आपल्या या पोस्टमध्ये धवनने लिहिले आहे की, ” विश्वचषकातून बाहेर पडताना मी फार भावुक झालो आहे. दुर्देवाने माझ्या अंगठ्याची दुखापत बरी होऊ शकलेली नाही. पण विश्वचषक सुरु राहायलाच हवा. मला संघातील खेळाडूंनी, देशवासियांनी आणि चाहत्यांनी जो पाठिंबा दिला, त्याबद्दल सर्वांचे आभार. जयहिंद.”

आपलं सरकार

Click to listen highlighted text!