Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Andhra Pradesh : चंद्राबाबू युरोपात आणि तेलुगू देसमचे राज्यसभेतील ६ पैकी ४ सदस्य भाजपवासी

Spread the love

तेलुगू देसमचे राज्यसभेतील ६ पैकी ४ सदस्य आज चंद्राबाबू यांची साथ सोडून भाजपवासी झाले आहेत. चारही खासदारांनी तेलुगू देसम पक्ष भाजपात विलीन करण्याचा प्रस्ताव संमत केला व तसं पत्र राज्यसभेचे सभापती, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना सादर केलं. त्यास नायडू यांनी तत्काळ मंजुरी दिली. दरम्यान, नव्या चार सदस्यांमुळे भाजपचं राज्यसभेतील बळ वाढलं आहे. यामुळे  लोकसभा व विधानसभा निवडणुकीत आंध्र प्रदेशात मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागल्यानंतर तेलुगू देसम पक्षाला आणखी एक मोठा झटका बसला आहे.

भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत टी. जी. व्यंकटेश, सी. एम. रमेश आणि वाय. एस. चौधरी यांनी आज भाजपात प्रवेश केला तर जी. एम. राव हे नंतर प्रवेश करणार आहेत. आज प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते प्रवेश सोहळ्याला उपस्थित राहू शकले नाहीत, असे नड्डा यांनी स्पष्ट केले.

या चारही खासदारांनी भाजपाध्यक्ष अमित शहा यांना पत्र लिहून भाजपात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली होती. हे पत्र घेऊन आम्ही उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांची भेट घेतली व पुढील सोपस्कार पूर्ण केले आहेत. हे चारही खासदार आता भाजपचे सदस्य आहेत, असे नड्डा यांनी पुढे नमूद केले.  दरम्यान, हे मी पक्षावरचं संकट मानत नाही, अशी प्रतिक्रिया चंद्राबाबू नायडू यांनी दिली. तेलुगू देसम पक्षाला कमकुवत करण्यासाठी भाजपकडून जे फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे, त्याचा मी निषेध करत असल्याचेही चंद्राबाबू म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!