दानवे म्हणाले, खोतकर आणि आमच्यात निवडणुकीपूर्वीच सेटलमेंट झाली होती, नंतर फक्त नाटक सुरू होतं !!

केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा आज जालन्यात सर्वपक्षीय सत्कार करण्यात आला. लोकसभा निवडणुकीदरम्यान दानवे आणि शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्यातल्या वाद राज्यभर गाजला होता नंतर त्याचं मनोमिलन झालं. या वादावर दानवेंनी आज गौप्यस्फोट केला आणि नेमकं काय झालं ते त्यांच्या खास शैलीत सांगितलं.
दानवे म्हणाले, अर्जुन खोतकर आणि आमच्यात निवडणुकीपूर्वीच दोन महिने अगोदर सेटलमेंट झाली होती, नंतर फक्त नाटक सुरू होतं. आपल्याला गेली 35 वर्ष राजकारणात सक्रिय ठेवणारी जनता जनार्दनच आपली देव असल्याचे सांगत दानवे यांनी खोतकर दानवे वादातला हा नवा खुलासा केला. लोकसभा निवडणुकीत दानवे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाल्या नंतर मोदी सरकार मध्ये त्यांना ग्राहक संरक्षण राज्यमंत्री पदाचा कार्यभार त्यांच्यावर सोपवण्यात आलाय. जालना येथे सर्वच राजकीय नेते आणि प्रतिष्ठीत नागरिकांच्या वतीने दानवे यांचा गौरव करण्यात आला. अर्जुन खोतकर म्हणाले, रावसाहेब दानवेंच्या हातात जादू आहे. ते सतत दैदीप्यमान यश मिळवतात. अमित शहा यांना भेटून विनंती करणार की विधानसभा निवडणुकीपर्यंत पर्यंत दानवेना प्रदेशाध्यक्षपदी राहू द्यावे.