Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Shalimar Express : प्रेयसीच्या नवऱ्याला अडकवण्यासाठी ” त्याने ” रचला बनाव !! संशयित एटीएस च्या कचाट्यात

Spread the love

शालिमार एक्स्प्रेस कथित जिलेटिन कांड्या प्रकरणी बुलडाणा येथून एका संशयिताला एटीएसने ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेण्यात आलेला संशयित हा २५ वर्षाचा तरुण आहे. त्याची चौकशी केली असता एक धक्कादायक बाब समोर आली आहे. मुंबईतील प्रेयसिच्या नवऱ्याला अडकवण्यासाठी त्याने हा बनवा रचला असल्याचे समोर येत आहे. याप्रकरणी संशयित आरोपीची चौकशी सुरु आहे. याप्रकरणाच्या तपासातून आणखी महत्वाच्या बाबी समोर येण्याची शक्यता आहे.

या घटनेची माहिती मिळताच लोकमान्य टिळक टर्मिनस परिसर पोलिसांनी रिकामा केला होता. त्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी जिलेटीन जप्त करुन तपासाला सुरुवात केली होती. सीसीटीव्हीच्या माध्यमातून जिलॅटिन कांड्याचे पार्सल कोण आणि कुठून घेऊन चढले याचा तपास सुरू केला होता. या प्रकरणाची दखल राज्य दहशतवाद विरोधी पथकाने घेतली असून दहशतवाद विरोधी पथकाचे एक पथक लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दाखल झाले होते. याप्रकरणाचा तपास सुरु असताना जिलेटनच्या कांड्या सापडल्या त्याठिकाणी पोलिसांना एक पत्र सापडले होते. त्यावरुन तपास करत पोलिसांनी एका संशयितांना अटक केली.

लोकमान्य टिळक टर्मिनस येथील यार्डात थांबलेल्या शालिमार एक्स्प्रेसच्या डब्यात जिलेटीनच्या पाच कांड्या आढळून आल्या होत्या. या घटनेमुळे लोकमान्य टिळक टर्मिनस परिसरात एकच खळबळ उडाली होती. लोकमान्य टिळक रेल्वे टर्मिनस येथे पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास शालिमार एक्स्प्रेस आली होती. प्रवाशी उतरल्यांनंतर ही गाडी यार्डात साफसफाईसाठी आणण्यात आली होती. साफसफाई सुरू असताना गार्डच्या शेजारी असलेल्या सामान्य डब्यातील आसनाखाली सफाई कर्मचाऱ्यांना जिलेटीन कांड्या दिसल्या. सफाई कर्मचाऱ्यांनी याची सूचना रेल्वे पोलिसांना दिली होती.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!