Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मोदींच्या शपथविधी सोहळ्याला इम्रान खानना आमंत्रण नाही

Spread the love

दहशतवादी कारवाया आणि पाकिस्तानसोबत चर्चा एकाचवेळी होऊ शकणार नाही हे भारताचे पाक संदर्भातील धोरण सुरूच राहणार असल्याचे पंतप्रधान मोदी नरेद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यानिमित्त स्पष्ट झाले आहे. गुरुवारी, ३० मे २०१९ या दिवशी होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी कार्यक्रमाला बिम्सटेक देशांच्या प्रमुखांना आमंत्रित करण्यात आले असले तरी, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना मात्र आमंत्रण देण्यात आलेले नाही. बिम्सटेक देशांमध्ये बांगलादेश, भारत, म्यानमार, श्रीलंका, थायलंड, नेपाळ आणि भुतान, किरगिझस्तान आणि मॉरिशस या देशांचा समावेश आहे. ‘प्रथम शेजार’ या धोरणानुसार भारताने अन्य देशांना आमंत्रित करण्यापूर्वी आपल्या शेजारी राष्ट्रांना आमंत्रणे धाडली आहेत, असे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. यातून पाकिस्तानला वगळून भारताने पाकिस्तानाला एक प्रकारे इशाराच दिल्याचे बोलले जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन २०१४ च्या निवडणुकीनंतर शपथविधी सोहळ्याला सार्क देशांना आमंत्रित केले होते. त्यात पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ याचा समावेश होता. यावेळी मात्र भारताचा पाकिस्तानकडे पाहण्याचा दृष्टीकोन पूर्णपणे बदललेला आहे. पाक पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताशी संबंध सौहार्दाचे होण्याबाबत विचार व्यक्त केले असले, तरी देखील दहशतवाद आणि बोलणी एकत्र होणार नाहीत या आपल्या भूमिकेवर भारत ठाम असल्याचे संकेतच या कृतीतून भारताने पाकिस्तानला दिले आहेत.

सन २०१४ मध्ये पंतप्रधान मोदी आणि नवाझ शरीफ यांनी दोन्ही देशांदरम्यान बोलणी सुरू करण्यासाठी पावले उचलली होती. मात्र पुन्हा दहशतवादी हल्ले सुरू झाले. या वेळी निवडणूक प्रचारातील पाक पुरस्कृत दहशतवाद हा भाजपचा प्रचाराचा प्रमुख मुद्दा होता. असे असताना शपथविधी सोहळ्यासाठी पाकला आमंत्रण धाडण्याबाबत केंद्र सरकार विचार करेल अशी शक्यताही नव्हती.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!