Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ महामानवाची गौरवगाथा : रमाईची भूमिका कुणाची ?

Advertisements
Advertisements
Spread the love

बुद्धपौर्णिमेपासून स्टार प्रवाहवर ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ महामानवाची गौरवगाथा ही मालिका सुरु झाली आहे. या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेत बाबासाहेबांच्या पत्नीची म्हणजेच रमाबाईंची भूमिका कोण साकारणार याची सर्वत्र चर्चा सुरु होती.  अभिनेत्री शिवानी रांगोळे ही भूमिका साकारणार  आहे. ऐतिहासिक भूमिका साकारण्याची तिची ही पहिलीच वेळ आहे आणि त्यासाठी ती प्रचंड उत्सुक आहे.

Advertisements

रमाबाई म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग. बाबासाहेबांचे उच्च शिक्षण असो, आंदोलने असो वा सत्याग्रह रमाबाई त्यांच्यापाठीशी सावली प्रमाणे उभ्या राहिल्या आणि त्यांनी कुटुंबही सांभाळले. महापुरुषाची सहचारिणी होण्याचे व्रत रमाबाईंनी मोठ्या निष्ठेने आणि प्रेमाने पाळले. अशा या थोर व्यक्तीची भूमिका साकारायला मिळणे ही खूप भाग्याची गोष्ट आहे असे शिवानीला वाटते.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!