काॅ. जोरावर खाॅ उर्फ जिल्लुमामु यांचे निधन

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ. जोरावर खान उर्फ जिल्लू मामू यांचे आज दुपारी साडेबारा वाजता निधन झाले.ते ८२ वर्षाचे होते. जिल्लू मामू म्हणून आख्या गंगापूर तालुक्यात त्यांची ओळख होती.भाकपचे दिवंगत नेते विश्वनाथ भोसले हे गंगापूर नगर परिषदेचे अध्यक्ष असताना जिल्लू मामू उपाध्यक्ष होते.
भाकपचे गंगापूर तालुका सचिव,जिल्हा कौन्सील सदस्य म्हणून अनेक वर्षे त्यानी जबादारी पेलली. राज्य कौन्सिचेही ते काही काळ सभासद राहिले.धूत सेठजीच्या मळ्यातील सालदाराचा लढा गाजला होता.
दिवंगत कॉ.चंद्रगुप्त चौधरी व कॉ .करुणाभाभी चौधरी हे दोघेही भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे गंगापूरचे आमदार म्हणून निवडून आलेले होते.यांच्या व कॉ.मनोहर टाकसाळ यांच्या नेत्रवताखाली झालेल्या भूमिहीनाच्या,सालदाराच्या,शेतमजुराच्या अनेक लढ्यात जील्लुमामू अग्रभागी होते. चार वर्षापूर्वी गंगापूर तहसील कार्यालयावर सतत ५ दिवस २५० रोजगार हमी मजुराचां लढा चालला. तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या कार्यालयाचा ताबा घेणे,तहसील परिसरात ठाण मांडणे ,अटक,एसडीएम ची गाडी अडवणे, इत्यादी मार्गाने पेटलेल्या आंदोलनात त्यांची उपस्थिती प्रेरणादायी असायची.१५ वर्षापूर्वी त्यानी विधानसभेचीही निवडणूक भाकपच्या वतीने लढवली होती.
२०१४ साली गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदार संघातून भाकपने मला उमेदवारी दिली होती.त्या निवडणुकीतही ते प्रचारकार्यात सक्रिय होते.गंगापुरात त्यांच्या जुन्या तहसील जवळच्या घरी बेकरीचा व्यवसाय होता व आजही आहे. उत्तम भाषण,दांडगा संपर्क असलेले जिल्लू मामू गेली काही दिवस आजारीच होते.आज रात्री १० वाजता गंगापुरात अंत्ययात्रा निघेल .