Yes My Doctor : एका क्लिकवर जुळणार आता डॉक्टर आणि रुग्णाचे नाते !! रविकिरण इंफोटेक, औरंगाबादचे अभिनव मोबाईल अप्लिकेशन

आजच्या काळात रुग्ण आणि डॉक्टर हे नाते नित्याचे झाले आहे . एखाद्याला कुठलाही आजार झाल्यास त्याला योग्य आणि तज्ज्ञ डॉक्टर मिळणे आजच्या काळात मोठे आव्हान निर्माण झाले आहे . सर्वसामान्य नागरिकांची आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन रविकिरण इन्फोटेक औरंगाबाद यांनी यावर संशोधन करून Yes My Doctor For Doctors आणि Yes My Doctor For Patient असे दोन स्वतंत्र मोबाईल अँप विकसित केले आहेत. आणि गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असलेले Yes My Doctor For Patient हे App नागरिकांसाठी विनामूल्य डाऊनलोड करता येणार असल्याची माहिती रविकिरण इन्फोटेक औरंगाबादचे संचालक सौरभ सावजी यांनी आज एका पत्रकार परिषदेत दिली.या पत्रकार परिषदेला आयएमएचे अध्यक्ष डॉ. सोमाणी, प्रसिद्ध उद्योजक उल्हास गवळी यांची विशेष उपस्थिती होती.
या app संदर्भात अधिक माहिती देताना सौरभ सावजी म्हणाले कि , यातील Yes My Doctor For Doctors हे App डॉक्टरांसाठी असून या App च्या साहाय्याने संबंधित डॉक्टर गरजू रुग्णांपर्यंत अगदी सहजपणे केवळ एका क्लिकवर पोहोचू शकतात आणि गरजेनुसार आपली सेवा देऊ शकतात. सध्या १८० डॉक्टर्सनी या App वर नोंदणी केली असून हे नेटवर्क सातत्याने वाढत आहे . या App मध्ये एखाद्या रुग्णाने डॉक्टरशी संपर्क साधण्यासंदर्भात केलेली विनंती संबंधित डॉक्टरच्या App वर जाते त्यानुसार डॉक्टर्स रुग्णाशी संपर्क साधून योग्य ती कार्यवाही करू शकतात .
यातील Yes My Doctor For Patient हे App सर्वसामान्य नागरिकांसाठी असून या App च्या साहाय्याने कोणताही नागरिक आपल्या गरजेनुसार App मध्ये दिलेल्या सूचीतील डॉक्टरांच्या स्पेशलायझेशननुसार कुठल्याही डॉक्टर्सला एका क्लिकवर भेटीसंदर्भात थेट ” संदेश ” पाठवू शकतात. हा संदेश प्राप्त होताच उपलब्ध असलेले डॉक्टर्स रुग्णांना भेटू शकतात आणि योग्य ती कार्यवाही करू शकतात.
” Quick Help “
कोणत्याही रुग्णाला आपत्कालीन परिस्थितीसाठी ” Quick Help हे बटन या App चे महत्वाचे वैशिष्ठ्य असून अशा प्रसंगी दोन किलोमीटरच्या अंतरावरील डॉक्टर्स रुग्णांसाठी तत्काळ उपलब्ध होऊ शकतात. या बटणाच्या सुविधेनुसार जर त्या अंतरातील डॉक्टर्स उपलब्ध नसतील तर आपोआप हा संदेश दुसऱ्या डॉक्टर्सकडे ट्रान्सफर होईल.
सदरील दोन्हीही App डॉक्टर्स आणि रुग्ण व कोणत्याही सर्वसामान्य नागरिकांसाठी सुविधाजनक असून हे App वापरण्यासाठी अत्यंत सोपे म्हणजेच फ्रेन्डली आहेत. हे App म्हणजे सर्वसामान्य नागरिक ,रुग्ण आणि डॉक्टर्स यांच्यातील केवळ महत्वाचा दुवाच नाही तर वरदान आहे .
या दोन्हीही Appचा डॉक्टर्स आणि रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन या पत्रकार परिषदेत करण्यात आले.या प्रसंगी रविकिरण इन्फोटेकचे रविकिरण सावजी यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर इशा सौरभ सावजी यांनी पॉव रपॉईंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून App चे सादरीकरण केले.
App च्या लिंक पुढीलप्रमाणे आहेत .
Yes My Doctor For Doctors
https://play.google.com/store/apps/details?id=ravikiraninfotech.com.drapp
Yes My Doctor For Patient
https://play.google.com/store/apps/details?id=ravikiraninfotech.com.patientapp