Congratulation : औरंगाबादचा आदित्य धनंजय मिरखेलकर युपीएसीत १५५ वा

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातले निवृत्त ऑपरेटर धनंजय मिरखेलकर यांचा मुलगा आदित्यने युपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळवले असून, तो १५५ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. विशेष म्हणजे त्याची आई धनश्री या देखील पालिका शाळेत शिक्षिका होत्या. आदित्यचे शिक्षण देखील महापालिका शाळेतून झाले आहे. युपीएससी परीक्षेचा अंतिम निकाल शुक्रवारी जाहीर झाला. त्यात आदित्यला १५५वा रँक मिळाला