Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aire strike : बालाकोटच्या चित्रांवरून ट्विटरवर सरकार आणि विरोधकांची टिव-टिव …

Spread the love

बालाकोटमध्ये भारतीय हवाई दलाने  केलेल्या एअर स्ट्राइकचे पुरावे सरकारने जाहीर करावेत, अशी मागणी विरोधी पक्षांकडून करण्यात येत असून बालाकोट एअर स्ट्राइकचे पुरावे वायुसेनेने सरकारला दिले आहेत . एअर स्ट्राइकनंतरही त्या परिसरात इमारती जशाच्या तशा आहेत, असा दावा काही छायाचित्रांच्या आधारे आंतरराष्ट्रीय मीडियाने  केल्यानंतर हा वाद सुरू झाला आहे. त्याचवेळी ‘टाइम्स नाऊ’नं एअर स्ट्राइकचे पुरावे म्हणून १२ छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. सीक्रेट एअर फोर्स ऑपरेशनच्या छायाचित्रांच्या आधारे एअर स्ट्राइकमध्ये झालेलं अतोनात नुकसान स्पष्ट दिसत आहे, असा दावा केला आहे. अहवालानुसार, भारतीय हवाई दलानं बालाकोटमध्ये एअर स्ट्राइक करून मोठं नुकसान केलं आहे. बॉम्बहल्ल्यात ‘जैश’ची प्रशिक्षण केंद्रे उद्ध्वस्त झाल्याचं छायाचित्रांमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. बंकर बस्टिंग मिसाइलच्या हल्ल्यात पूर्ण इमारत उद्ध्वस्त होईलच असं नाही, असं अहवालात म्हटलंय. छायाचित्रांनुसार, भारतीय हवाई दलानं थेट इमारतीवरच मिसाइल डागलं आहे. तिथे चार मोठे काळ्या रंगाचे छिद्र दिसत आहेत. बालाकोटमध्ये ‘जैश’च्या कॅम्पमधील इमारती जशाच्या तशा उभ्या आहेत आणि एअर स्ट्राइकमध्ये कोणतंही नुकसान झालं नाही, असं वृत्त आंतरराष्ट्रीय मीडियानं काही दिवसांपूर्वी उपग्रहांद्वारे पाठवलेल्या छायाचित्रांच्या आधारे दिलं होतं. तर संपूर्ण क्षमतेनं लक्ष्यभेद केला होता, असं भारतीय हवाई दलानं स्पष्ट केलं होतं.

दरम्यान या प्रकरणावरून विरोधक आणि सरकारमध्ये चांगलीच जुंपली असून या लढाईत माध्यामांतही  आपापसात चांगलेच वाद विवाद रंगले आहेत. भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात घुसून बालकोट भागात अनेक दहशतवादी अड्डे उधवस्त केले. पुलवामा हल्ल्याच्या बदला घेण्यासाठी भारताने दहशतवाद्यांना टार्गेट करत पाकिस्तानातील त्यांच्या तळांवर एअर स्ट्राईक केला. या एअर स्ट्राईकबाबत काँग्रेसचे जेष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी संशय व्यक्त केला. जर एअर स्ट्राईक झाला असेल त्यात किती दहशतवादी मारले गेले याची माहिती सरकारने द्यावी अशी मागणी सिंह यांनी केली.  मात्र आत्ता पुन्हा एकदा ऱॉयटर या संस्थेचा हवाला देत दिग्विजय सिंह यांनी ट्विट करत एअर स्ट्राईकवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. हवाई दलाच्या एअऱ स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांचे किती नुकसान झाले त्याचे पुरावे द्यावेत, आंतरराष्ट्रीय पातळीवर एअऱ स्ट्राईकवर शंका उपस्थित होत आहे त्याचे निरसन केंद्र सरकारने करावे अशी मागणी दिग्विजय सिंह केली.

रॉयटर या संस्थेने एअर स्ट्राईकनंतरच्या 6 दिवसांनंतर 4 मार्च रोजी बालकोट भागात घेतलेले सँटेलाईट इमेज जारी केले. या फोटोमध्ये ज्या ठिकाणी हवाई दलाने बॉम्ब टाकले त्याठिकाणी असलेल्या इमारती जैसे थे असल्याचा दावा केला. जैश-ए-मोहम्मदकडून दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यासाठी ज्या मदरसा इमारतीचा वापर केला जातो ती इमारत बॉम्ब हल्ल्यानंतर साबूत असल्याचं दाखविण्यात आले आहे.

पाकिस्तानच्या उत्तर पूर्व भागात असणाऱ्या बालकोट परिसरात जैश-ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेकडून मदरशा चालवला जातो. याच ठिकाणी दहशतवाद्यांना ट्रेंनिग दिले जाते. दहशतवाद्यांच्या या कॅम्पला पाकिस्तानकडूनही मदत होत असल्याचा आरोप भारताकडून केला जातो. जैश-ए-मोहम्मद संघटनेचे सर्वांत मोठे प्रशिक्षण केंद्र बालकोट भागात असून मौलाना मसूद अजहरचा मेहुणा मौलाना युसूफ अजहर हे प्रशिक्षण केंद्र चालवत होता. हेच केंद्र पहाटेच्या अंधारात भारतीय हवाई दलाने एअऱ स्ट्राईक करत उधवस्त केल्याची माहिती परराष्ट्र सचिव विजय़ गोखले यांनी माध्यमांना दिली होती.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!