तयार राहा करोडपती व्हायला नागराज मंजुळे यांच्यासोबत …

सोनी मराठी चॅनेलवर आता मराठीतही ‘कोण होणार करोडपती’ ? हा शो येत आहे. सुप्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेते नागराज मंजुळे या शोमध्ये सूत्रसंचालकाच्या खुर्चीत बसणार आहेत. सोनी मराठी चॅनेलच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून त्याचा व्हिडिओ टीझर रिलीज करण्यात आला आहे. व्हिडिओत नागराज मंजुळे सूत्रसंचालकाच्या खुर्चीवर बसताना दिसत आहेत. हा शो नेमका कधी सुरू होणार हे मात्र स्पष्ट करण्यात आलेलं नाही. हिंदीतील “कौन बनेगा करोडपती”या अमिताभच्या शोनंतर आता मराठीतील हा शो सुद्धा नागराज मंजुळे यांच्या सूत्रसंचालनामुळे लोकप्रिय होईल यात शंका नाही.