विजया रहाटकर पुन्हा एकदा महिला आयोगाच्या अध्यक्षपदी

महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांची पुन्हा एकदा याच पदावर नेमणूक करण्यात आली आहे. पुढील तीन वर्षांसाठी त्या महिला आयोगाच्या अध्यक्ष असतील. महाराष्ट्र सरकारने विजया रहाटकर यांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती केली आहे.
विजया रहाटकर यांनी महिला अध्यक्षपदी असताना महिलांच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम केलं आहे. आता पुन्हा एकदा त्याच प्रकारे त्या काम करतील अशी अपेक्षा आहे. मागील वर्षीच्या मे महिन्यात विजया रहाटकर यांनी सोशल मीडियावर मुलींची होणारी बदनामी, छळवणूक रोखण्यासाठी सायबर समितीची स्थापना केली. मुलींना-महिलांना लक्ष्य केल्या जाणाऱ्या प्रकरणांचा अभ्यास करून अशा प्रकारांवर नियंत्रण आणण्यासाठी ही समिती काम करते आहे. अशा अनेक गोष्टी त्यांनी आत्तापर्यंतच्या कारकिर्दीत केल्या आहेत त्यामुळे त्यांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदी पुनर्निवड करण्यात आली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने हे वृत्त दिले आहे.