Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

रजनीकांतची मुलगी सौंदर्या दुसऱ्यांदा विवाहबंधनात

Advertisements
Advertisements
Spread the love

सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या तिच्या घटस्फोटानंतर आज पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकली. अभिनेता आणि व्यावसायिक विशागन वनंगमुदीसोबत तिने लग्नगाठ बांधली.रजनीकांत यांच्या मुलीचा शाही विवाहसोहळा आज चेन्नईमध्ये पार पडला. या लग्नसमारंभासाठी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेक बड्या कलाकारांनी हजेरी लावली. लग्नानंतर रजनीकांत यांच्या घरी ग्रँड रिसेप्शन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे.
सौंदर्याचं हे दुसरं लग्न आहे. याआधी सौंदर्याने व्यावसायिक अश्विन रामकुमार यांच्यासोबत प्रेमविवाह केला होता. आठ वर्षांच्या संसारानंतर २०१६मध्ये या दोघांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर ती आणि विशागन भेटले. विशगनचं देखील हे दुसरं लग्न आहे.

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!