भारताची धमाकेदार सुरुवात, 3 षटकांत बिनबाद 21

कर्णधार रोहित शर्माचे झंझावाती अर्धशतक
न्यूझीलंडची ‘ग्रँड’ फटकेबाजी; भारतापुढे १५९ धावांचे आव्हान
IND vs NZ 2nd T20I Live : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरा टी २० सामना सुरु आहे. या सामन्यात न्यूझीलंडने भारताला १५९ धावांचे आव्हान दिले आहे. कॉलिन डी ग्रॅंडहोम याने केलेल्या तडाखेबाज अर्धशतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ८ बाद १५८ धावा केल्या. गेल्या सामन्यात चमक दाखवणारे सलामीवीर सिफर्ट (१२) आणि मुनरो (१२) स्वस्तात बाद झाले. कर्णधार विल्यमसन (२०) आणि मिचेलही (१) फारशी चांगली कामगिरी करू शकले नाहीत. मात्र त्यानंतर मैदानावर आलेल्या डी ग्रँडहोम आणि टेलरने डाव सावरला. ग्रँडहोमने १ चौकार आणि ४ षटकार लगावत २८ चेंडूत ५० धावा केल्या, तर टेलरने ४२ धावांची संयमी खेळी केली. भारताकडून कृणाल पांड्याने ३, खलील अहमदने २ आणि भुवनेश्वर व हार्दिक पांड्याने १-१ गडी टिपला.