Himachal Pradesh : हिमाचल प्रदेशचे १५ वे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुखू

हिमाचल प्रदेशचे १५ वे मुख्यमंत्री म्हणून सुखविंदर सिंह सुखू यांनी शपथ घेतली आहे. शिमला येथील रिज मैदानावर हिमाचलचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी सखू यांना मंत्रिपदाची शपथ दिली. दरम्यान, काँग्रेस नेते मुकेश अग्निहोत्री यांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते.
हिमाचल चे नवे उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री यांनी शपथ घेतल्यानंतर वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, पहिल्या कॅबिनेट बैठकीत जनतेला दिलेली आश्वासने आम्ही पूर्ण करू. जुनी पेन्शन योजना पूर्ववत केली जाईल. काँग्रेस कोणत्याही राज्यात सत्तेवर येणार नाही, असे पूर्वी लोक म्हणायचे, पण आज आम्ही भाजपचा रथ रोखला आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
शपथ घेण्यापूर्वी मीडियाशी बोलताना मुख्यमंत्री सुखू म्हणाले की, आता राजकारण बदलत आहे आणि काँग्रेसमध्ये सामान्य कार्यकर्त्यांना मोठ्या जबाबदाऱ्या मिळत आहेत. हिमाचलच्या निकालामुळे देशाच्या राजकारणात मोठा बदल होणार आहे. दरम्यान, शिमला ग्रामीणचे दुसऱ्यांदा आमदार असलेले आणि माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे पुत्र विक्रमादित्य म्हणाले की, काँग्रेस पक्षात कोणत्याही प्रकारचा वाद नाही. पक्षाने कोणत्याही प्रकारची जबाबदारी दिल्यास खरा सैनिक म्हणून जबाबदारी पार पाडली जाईल. सीएम सुखविंदर सिंग सुखू यांनी म्हणाले.
दरम्यान, मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रियांका गांधी वाड्रा, अशोक गेहलोत, सचिन पायलट, भूपेश बघेल, भूपेंद्र सिंग हुडा, राजीव शुक्ला, प्रतिभा सिंग यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. सुखविंदर सिंग सुखूची आई संसार देवी शपथविधी सोहळ्यापूर्वी शिमल्याच्या संजोली हेलिपॅडवर पोहोचल्या. येथे सुखूंनी त्यांचे स्वागत केले. मुलगा यापुढेही जनतेची सेवा करणार असल्याची प्रतिक्रिया त्यांच्या आईने दिली.
PuneNewsUpdate : मी कुणालाही घाबरत नाही. हिंमत असेल तर समोरुन या, चंद्रकांत पाटील यांचे आव्हान …
News Update on one click
http://mahanayakonline.com
Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline
For current updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055