Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

NaharashtraNewsUpdate : राज्यातील १०४ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या , कोण कुठे गेले आणि आले ?

Spread the love

मुंबई  : राज्यातील पाेलीस उपायुक्त, अतिरिक्त अधीक्षक तसेच पोलीस अधीक्षक दर्जाच्या १०४ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश गृहविभागाने सोमवारी सायंकाळी दिले आहे. बदली करण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचे नाव आणि कंसात कोठून कोठे नियुक्ती झाली ? याची माहिती पुढीलप्रमाणे…

सर्वाधिक बदल्या पुण्यातून…

अरविंद चावरिया (पदस्थापनेच्या प्रतिक्षेत ते पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग), संदीप सिंह गिल (राज्य राखीव पोलीस दल, हिंगोली, समादेशक ते पोलीस उपायुक्त, पुणे शहर), राजेश बनसोडे (पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ते बिनतारी संदेश विभाग), स्मार्तना पाटील (पोलीस अधीक्षक, बिनतारी संदेश विभाग ते पोलीस उपायुक्त, पुणे शहर), अमोल तांबे, (पोलीस उपायुक्त, नाशिक ते लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे ), सुहेल शर्मा (पदस्थापनेच्या प्रतिक्षेत ते पोलीस उपायु्क्त, पुणे शहर).

प्रवीण पाटील (पदस्थापनेच्या प्रतिक्षेत ते राज्य राखीव पोलीस दल, पुणे), दीपक देवराज (पोलीस अधीक्षक, राज्य सुरक्षा महामंडळ ते राज्य राखीव पोलीस दल, पुणे), शशिकांत बोराटे (प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, खंडाळा ते पोलीस उपायुक्त, पुणे), आनंद भोईटे (पोलीस उपायुक्त, पिंपरी-चिंचवड ते अतिरिक्त पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण), विक्रांत देशमुख (अतिरिक्त पोलीस अधीक्षक जालना ते पोलीस उपायु्क्त, पुणे शहर), राजलक्ष्मी शिवणकर (राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, नागपूर ते पोलीस अधीक्षक, लोहमार्ग, पुणे), अमोल झेंडे (पोलीस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण, ठाणे ते पोलीस उपायुक्त, पुणे शहर), स्वप्ना गोरे, (प्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र, सोलापूर ते पिंपरी-चिंचवड), विजयकुमार मगर (पदस्थापनेच्या प्रतिक्षेत ते पोलीस उपायुक्त, पुणे शहर).

प्रियंका नारनवरे (पोलीस उपायुक्त पुणे ते राज्य राखीव पोलीस दल, नागपूर), भाग्यश्री नवटके (पोलीस उपायुक्त, पुणे ते राज्य राखीव पोलीस दल, चंद्रपूर), पौर्णिमा गायकवाड (पोलीस उपायुक्त, पुणे ते राज्य राखीव पोलीस दल, हिंगोली), नम्रता पाटील (पोलीस उपायुक्त, पुणे ते पोलीस अधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, मुंबई), राहुल श्रीरामे (पोलीस उपायुक्त, पुणे ते राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई), सागर पाटील (पोलीस उपायुक्त, पुणे ते उपायुक्त, अमरावती शहर), विवेक पाटील (पोलीस उपायुक्त, पुणे शहर ते पिंपरी-चिंचवड)

आपलं सरकार

Click to listen highlighted text!