Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharshtraNewsUpdate : मालेगाव दंगल प्रकरणातील ३० आरोपींना उच्च न्यायालयाचा जामीन …

Spread the love

मुंबई :  १२ नोव्हेंबर २०२१ मध्ये मालेगाव येथे उसळलेल्या दंगलीत सात पोलिसांना जखमी केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या ३० जणांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. याचिकाकर्ते यापूर्वी अशा प्रकारच्या दंगलीत सहभागी झाल्याचे किंवा हा हिंसाचार पूर्वनियोजित असल्याचे पुढे आलेले नाही. शिवाय याचिकाकर्त्यांपैकी बरेचजण ११ महिन्यांपासून तुरुंगात आहेत आणि त्यांना कारागृहात ठेवून कोणताही हेतू साध्य होणार नाही, असे न्यायमूर्ती पी. डी. नाईक यांच्या एकलपीठाने या ३० जणांना जामीन मंजूर करताना नमूद केले.


MaharshtraNewsUpdate  : या प्रकरणाची अधिक माहिती अशी कि , गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात त्रिपुरा येथे झालेल्या जातीय हिंसाचाराच्या निषेधार्थ १२ नोव्हेंबर २०२१ रोजी मालेगाव, अमरावती, नांदेड येथे मोर्चा काढण्यात आला होता. दरम्यान  मालेगाव येथे या मोर्चाच्या वेळी  हिंसाचार उसळल्यानंतर  पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न केला तेव्हा पोलिसांवर दगडफेकीची घटना घडली. यात तीन अधिकाऱ्यांसह सात पोलीस जखमी झाले. याशिवाय चार सामाजिक कार्यकर्तेही या हिंसाचारात जखमी झाले होते.

या प्रकरणी दंगलखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आणि चारजणांना अटक करण्यात आली. मात्र हा हिंसाचार पूर्वनियोजित नव्हता, असे न्यायालयाला सांगण्यात आले. तीन महिन्यांनंतर साक्षीदारांच्या जबाबाच्या आधारे काही याचिकाकर्त्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. परंतु याचिकाकर्त्यांना दोषी ठरवण्यासाठी पोलिसांकडे कोणतेही पुरावे नाहीत. तसेच पोलिसांना दुखापत ही आंदोलकांपैकी कोणीही केलेल्या दगडफेकीमुळे होऊ शकते. त्यामुळे मोर्चाचा भाग म्हणून याचिकाकर्त्यांना अटक करणे चुकीचे असल्याचा दावाही याचिकाकर्त्यांतर्फे करण्यात आला.

गुन्हा दाखल करण्यात आलेल्या काही व्यक्तींना अटकपूर्व जामीन मिळाला, तर काही जण ११ महिने कारागृहात होते. दरम्यान या प्रकरणाचा तपासही पूर्ण झाला असल्याने याचिकाकर्त्यांना जामीन मंजूर करण्याची मागणी याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी केली. तर पोलिस कर्मचाऱ्यांना झालेली दुखापत गंभीर असून आंदोलकांना भडकावण्यात याचिकाकर्त्यांची भूमिका होती, असा दावा करून पोलिसांनी याचिकाकर्त्यांच्या जामीन देण्याच्या मागणीला विरोध केला. न्यायालयाने याचिकाकर्त्यांच्या वतीने केलेला युक्तिवाद मान्य करून त्यांना जामीन मंजूर केला.

MaharshtraNewsUpdate


#TopNews | जाणून घ्या मनोरंजन विश्वातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी | #Entertainment

#TopNews | जाणून घ्या मनोरंजन विश्वातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी | #Entertainment

 

#LiveUpdate | जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी

#LiveUpdate | जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी

For current updates join

https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide

https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

आपलं सरकार

Click to listen highlighted text!